#पुन्हा निवडणूक? सई, सोनाली, सिद्धार्थपासून सगळ्यांच्या Twitter मेसेजमुळे वाद; काँग्रेसने केला थेट आरोप

#पुन्हा निवडणूक? सई, सोनाली, सिद्धार्थपासून सगळ्यांच्या Twitter मेसेजमुळे वाद; काँग्रेसने केला थेट आरोप

अनेक मराठी चित्रपट कलाकार अचानकपणे #पुन्हा निवडणूक? असा हॅशटॅग Tweet करू लागले आणि एक नवाच वाद सोशल मीडियावर निर्माण झाला आहे. हे खरंच भाजपने वापरलेलं प्रचारतंत्र आहे की सिनेमाचं प्रमोशन?

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : अनेक मराठी चित्रपट कलाकार अचानकपणे #पुन्हा निवडणूक? असा हॅशटॅग Tweet करू लागले आणि एक नवाच वाद सोशल मीडियावर निर्माण झाला आहे. काहींनी कलाकारांच्या बाजूने आणि काहींनी विरोधात Twitter वर  प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर अशा अनेक आघाडीच्या मराठी कलाकारांनी आपापल्या ट्विटर हँडलवर फक्त एवढा एकच हॅशटॅग लिहिला होता. त्याच्यापुढे फारसं काही स्पष्टीकरण नव्हतं. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मराठी कलाकारांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे, असं समजून अनेक जणांनी या कलाकारांना पाठिंबा दिला, तर अनेकांनी ट्रोलही केलं. भाजपचा हा डाव असल्याचे आरोपही आता होत आहेत. पण प्रत्यक्षात नेमकी ही राजकीय भूमिका आहे, नागरिक म्हणून मत आहे की कुठल्या सिनेमाचं प्रमोशन आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

मराठी कलाकारांना घेऊन भाजपने रचलेला हा डाव असल्याचे आरोप सुरू झाले आहेत. काही Twitter Users नी 'मनुवादी' म्हणून या मराठी कलाकारांवर टीकाही केली आहे.

काँग्रेसने घेतला आक्षेप

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकारच्या सोशल मीडियाच्या वापरावर आक्षेप नोंदवला आहे. ज्या पद्धतीने एकाच वेळी कलाकार पुन्हा निवडणूक असा हॅशटॅग वापरत आहत त्यामागे भाजपचा आयटी सेल सक्रिय झाला आहे, असं वाटतं.

वाचा - विरोधकांच्या आरोपाला अमोल कोल्हेंचं कृतीतून उत्तर

मराठी कलाकारांचा असा वापर होऊ नये. भाजप असा वापर करत असेल तर ते अनैतिक आहे. भाजप सुडाचं राजकारण करत आहे. मराठी कलाकारांचा वापर ते करू शकतात. यात नवीन नाही, असंही सावंत म्हणाले. महाराष्ट्रात अशा चुकीच्या प्रथा पाडू नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सचिन सावंत यांनी भाजपने हे यापूर्वी केलं असल्याचे आरोप केले. "कोब्रा पोस्टच्या व्हिडीओ मध्ये दिसलं होतं की भाजप पैसे देऊन हिंदी कलाकारांना ट्विट करायला सांगतात. असा मराठी कलाकारांचा वापर होऊ नये", असं सावंत म्हणाले.

प्रत्यक्षात काय?

ज्या पद्धतीने हे कलाकार व्यक्त होत आहेत, त्यावरून हे कुठल्या चित्रपटाचं प्रमोशन असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय चष्म्यातून प्रत्येक घटनेकडे न बघणाऱ्या काही यूजर्सनी या कलाकारांना ट्रोल करणाऱ्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. जानेवारीत प्रदर्शित होणाऱ्या धुरळा या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही युक्ती असू शकते, असं बोललं जात आहे.

अजून कलाकारांपैकी कुणीही याविषयी स्पष्टीकरण दिलेलं नाही.

(ही बातमी अपडेट होत आहे.)

-----------------------

अन्य बातम्या

128 दिवसांनी धोनीनं हातात घेतली बॅट, चाहत्यांनो VIDEO मिस करू नका

धक्कादायक! गाडी दिली नाही म्हणून मुलानं शाळेत स्वत:ला पेटवलं

'चिंता करू नका मी सर्वांची काळजी घेईन', अभिषेकनं बिग बींना लिहिलेलं पत्र VIRAL

First published: November 15, 2019, 3:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading