Home /News /entertainment /

Couple Goals: सिद्धार्थ-मिताली पुन्हा झाले रोमँटिक

Couple Goals: सिद्धार्थ-मिताली पुन्हा झाले रोमँटिक

2018 मध्ये अगदी व्हेलेंटाईन डे दिवशी या दोघांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबूली दिली होती.

  मुंबई, 8 सप्टेंबर-  मराठीतील एक गोड जोडी म्हणून मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि सिद्धार्थ चांदेकर(Sidharth Chandekar) यांना ओळखलं जात. या दोघांना सोशल मीडियावरदेखील प्रचंड पसंत केल जातं. हे जोडपं सतत सोशल मीडियावर एकेमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसून येत. या दोघांच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. नुकताच मिताली आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर आपला सुंदर फोटो शेयर(Share Photo) केला आहे. या फोटोंवर चाहते पुन्हा एकदा फिदा झाले आहेत.
  अभिनेत्री मिताली मयेकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये मिताली पती सिद्धार्थ चांदेकरसोबत आहे. फोटोमध्ये ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. या दोघांचं प्रेम पाहून अनेकांना कौतुक वाटतं. फोटोमध्ये मिताली सुंदर अशा साडीमध्ये तर सिद्धार्थ पारंपरिक कुर्त्यामध्ये दिसून येत आहे. फोटोमधील दोघांच्या हस्याने सर्वांना घायाळ केलं आहे. फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. (हे वाचा:VIDEO: गौरी-जयदीपला बाप्पाच्या आगमनाची ओढ; होणार जंगी स्वागत ) हे दोघेही 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सुरुवातील या दोघांच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावला जात होता. मात्र दोघांनीही कधीच यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र 2018 मध्ये अगदी व्हेलेंटाईन डे दिवशी या दोघांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबूली दिली होती. त्यांनतर काही दिवसांनी त्यांनी साखरपुडा करत सर्वांनाचं सुखद धक्का दिला होता. आणि काही महिन्यांपूर्वी पारंपरिक पद्धतीने लग्न करत यांनी एकेमकांसोबत जन्मभराची गाठ बांधली आहे. (हे वाचा:Theatre Release: चित्रपटगृहातच रिलीज होणार RRR,अटॅक आणि गंगूबाई काठियावाडी ) मिताली आणि सिद्धार्थचा लग्नसोहळा देखील खूपच चर्चेत आला होता. अगदी लग्नाच्या आधीपासूनच हे दोघे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होते. इतकच नव्हे तर या दोघांनी आपल्या केळवणाचेदेखील फोटो सोशल मीडियावर शेयर करत चाहत्यांचं प्रेम मिळवलं होतं. या दोघांनी पुणेरी वाडापद्धतीमध्ये अगदी मराठमोळ्या शाही थाटात लग्न केलं होतं. यावेळी अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या