Home /News /entertainment /

'पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहाबद्दल कळल्यापासून त्रास होतोय…' विशाखानंतर गायक मंगेश बोरगावकरची पोस्ट चर्चेत

'पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहाबद्दल कळल्यापासून त्रास होतोय…' विशाखानंतर गायक मंगेश बोरगावकरची पोस्ट चर्चेत

गायक मंगेश बोरगावकर याने देखील पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर या नाट्यगृहाबद्दल एक पोस्ट केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट ( singer mangesh borgaonkar ) चांगलीच चर्चेत आली आहे.

    मुंबई, 19 मे- अभिनेत्री विशाखा सुभेदार ( vishakha subhedar ) हिने नुकतेच पुण्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर भाष्य केले होते. पुण्यातील बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांमधील अस्वच्छता आणि दुर्गंधी याविषयी तिनं जाहीर मत फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडले होते. आता लोकप्रिय गायक मंगेश बोरगावकर याने देखील पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिर या नाट्यगृहाबद्दल एक पोस्ट केली आहे. सध्या त्याची ही पोस्ट (  singer mangesh borgaonkar  ) चांगलीच चर्चेत आली आहे. गायक मंगेश बोरगावकरनं बालगंधर्व नाट्यगृहाबद्दल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने बालगंधर्व ( singer mangesh borgaonkar latest post )  नाट्यगृहासमोर एक फोटो शेअर केला आहे. त्याने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, परवा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे कार्यक्रम झाला तेव्हा "तुमचा हा इथला शेवटचा कार्यक्रम" अस सांगण्यात आलं..सुरुवातीला कोणीतरी मजा करतंय अस वाटलं..पण दुर्दैवाने हे खरं असल्याचे कळल्यापासुन मात्र त्रास होतोय..' 'पार्किंग मधील झाडे ही तोडलेली दिसली..खरचं याची गरज आहे का!?? कोविड नंतर आता कुठे आपण सावरतोय..याऊलट सर्व नाट्यगृहांमधील सुविधा कशा उत्तम करता येतील याकडे ज़र लक्ष दिलं गेलं तर उत्तम होईल अस एक कलाकार व रसिक म्हणुन मनापासुन वाटतं…आपल्याला काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल….' मंगेश बोरगावकरची सध्या ही पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्री विशाखा सुभेदार ( vishakha subhedar ) हिने काही दिवसापूर्वी नाट्यगृहांच्या दुरवस्थेवर भाष्य केले होते. पुण्यातील बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांमधील अस्वच्छता आणि दुर्गंधी याविषयी तिनं जाहीर मत मांडले होते. तिथे प्रयोग करणे कलाकारांना जड जात असल्याचे ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हंटली होती. एवढेच नाही तर माध्यमांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती देखील तिच्याकडून करण्यात आली होती.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या