शुभमंगल सावधान ! गायिका कार्तिकी गायकवाड अडकली विवाहबंधनात

लिट्ल चॅम्पसची विजेती कार्तिकी गायकवाड (kartiki gaikwad) विवाहबंधनात अडकली आहे. आर्या आंबेकर, प्राजक्ता गायकवाड तिच्या लग्नाला उपस्थित होत्या.

लिट्ल चॅम्पसची विजेती कार्तिकी गायकवाड (kartiki gaikwad) विवाहबंधनात अडकली आहे. आर्या आंबेकर, प्राजक्ता गायकवाड तिच्या लग्नाला उपस्थित होत्या.

  • Share this:
    मुंबई, 10 डिसेंबर: आपल्या ठसकेबाज आवाजामुळे अगदी लहान वयातच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) लग्नाच्या बेडीत अडकली आहे. झी मराठीवरील लिट्ल चॅम्पस या कार्यक्रमामधून कार्तिकी पुढे आली. कार्तिकीला गाण्याचा वसा तिच्या वडिलांकडून मिळाला होता. कार्तिकीचे वडील कल्याणजी गायकवाड स्वत: उत्तम गायक आणि संगीतकार आहेत. रोनित पिसे (Ronit Phise) असं कार्तिकीच्या पतीचं नाव आहे. रोनित पेशाने मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याचा स्वत:चा व्यावसाय आहे.  26 जुलै  2020 रोजी त्यांचा साखरपुडा पार पडला होता. रोनित हा कार्तिकीच्या वडीलांच्या मित्राचाच मुलगा आहे. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये कार्तिकीचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला गायिका आर्या आंबेकर, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडही उपस्थित होत्या. कल्याणजी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. कसं जमलं लग्न? कार्तिकी गायकवाड आणि रोनित भिसे यांचा अगदी चार-चौघांसारखा दाखवण्याचा कार्यक्रम झाला होता असं कार्तिकीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. कार्तिकीने रोनितच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती. रोनित स्वत: गायक नसला तरी कानसेन आहे आणि कार्तिकीच्या कलेबद्दल त्याला नितांत आदर आहे असं ती म्हणते.
    लिटील चॅम्प्समध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली असताना तिने विविध बाजाची गाणी म्हटली होती. पण अभंग, गवळणी गाताना तिचा आवाज अधिकच खुलायचा. गजर किर्तनानाचा या कार्यक्रमामध्ये ती निवेदिका म्हणूनही समोर आली आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published: