Home /News /entertainment /

'गुलाबाची कली कशी... ' जुईली जोगळेकरला लागली हळद, सुंदर फोटो VIRAL

'गुलाबाची कली कशी... ' जुईली जोगळेकरला लागली हळद, सुंदर फोटो VIRAL

नुकताच समोर आलेल्या एका फोटोमध्ये जुईलीला हळद लागल्याचं दिसत आहे.

  मुंबई,19 जानेवारी-   मनोरंजन सृष्टीत सध्या लग्नासराईचं वारं वाहात आहे. यामध्ये आता मराठीतील चर्चित जोडपं रोहित राऊत   (Rohit Raut)  आणि जुईली जोगळेकर   (Juilee Jogalekar)  यांचाही समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वी पोस्ट करत त्यांनी आपल्या लग्नाची माहिती दिली होती. त्यांनतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला होता. आता त्यांची लगीनघाई   (Wedding Season)   सुरु झालेली दिसत आहे. नुकताच समोर आलेल्या एका फोटोमध्ये जुईलीला हळद लागल्याचं दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची जोडी चर्चेत आहे. सर्वांनाच यांच्या लग्नाची उत्सुकता लागून होती. आता त्यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकतंच राजश्री मराठीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जुईलीचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गायिकेला हळद लागल्याचं दिसून येत आहे. जुईली फारच आनंदी दिसत आहे. तसेच तिने गुलाबी रंगाची काठपदर साडी नेसली आहे. तिने मुंडावळ्यासुद्धा बांधल्या आहेत. ती या लुकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. परंतु जुईली किंवा रोहितने स्वतः अजूनही हे फोटो शेअर केलेले नाहीत.
  जुईली आणि रोहित गेली अनेक वर्षे एकेमकांना डेट करत आहेत. त्यांची जोडी चाहत्यांना फारच पसंत आहे. त्यांनी आपलं नातं खूप आधी ऑफिशियल केलं आहे.ते दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. इतकंच नव्हे तर सतत ते एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करून आपलं प्रेम व्यक्त करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्ट त्यांच्या चाहत्यांना फारच पसंत पडतात. काह दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या केळवणाचे फोटो शेअर केले होते. मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या एका जवळच्या मैत्रिणीने त्यांना केळवण दिलं होतं.
  रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांची पहिली भेट २००९ मध्ये ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती. झी मराठीवर आलेल्या या कार्यक्रमामध्ये दोघेही स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. रोहित राऊत या कार्यक्रमाचा विजेता ठरला होता. याच कार्यक्रमात रोहित आणि जुईली यांची मैत्री झाली होती. आणि नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आता हे दोघेही आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. येत्या २३ जानेवारीला हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Instagram post, Marathi entertainment

  पुढील बातम्या