मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'कान्हा चित्रपटावेळच्या वैभवची आणि आता सर्किट...' अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत

'कान्हा चित्रपटावेळच्या वैभवची आणि आता सर्किट...' अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत

मधुर भांडारकरच्या ‘सर्किट’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

मधुर भांडारकरच्या ‘सर्किट’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या ‘सर्किट’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 मार्च- मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. अवधूत गुप्ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकतीच अवधूत गुप्तेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

ऋता दुर्गुळे आणि वैभव तत्त्ववादीच्या ‘सर्किट’ चित्रपटाची सध्या सगळीकडं जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेने एक पोस्ट शेअर केली आहे.

'तुमच्या छत्रछायेत मी लहानाची ..' गिरीश बापट यांच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट

अवधूत गुप्तेनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पार्श्वगायक हा सुद्धा पडद्या पाठीमागे शेवटी अभिनयच करत असतो. अभिनेत्यासारखी त्याला देखील भूक असते वेगवेगळ्या भूमिका वठवायची. अशा वेगळ्याच गाण्यातून अशी वेगळीच भूमिका वठवायची संधी मला दिली आहे माझा लाडका मित्र संगीतकार अभिजीत कवठाळकर ह्याने.आगामी ‘सर्किट‘ ह्या चित्रपटाचा ट्रेलर आणि इतर गण्यातून दिसणारी दृश्य बघून संपूर्ण महाराष्ट्रा इतकीच मला देखील उत्सुकता लागली आहे की, कधी एकदा चित्रपट प्रदर्शित होतो आणि कधी एकदा मी जाऊन तो सिनेमागृहामध्ये पाहतो! आमच्या ‘कान्हा‘ चित्रपटावेळच्या वैभवची आणि आता ‘सर्किट‘ मधल्या वैभवाची शरीरयष्टी, ह्यातील फरक केवळ थक्क करून सोडतो! So proud of you Vaibhav!! ह्या सर्व गोष्टी इतक्या कौशल्याने घडवून आणल्याबद्दल दिग्दर्शक आकाश पेंढारकरांचं खूप कौतुक, चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आणि मला ह्या चित्रपटाचा भाग करून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद!

निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या ‘सर्किट’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. ‘सर्किट’ हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

अनेक वर्षे निर्मिती आणि प्रस्तुती केलेल्या आकाश पेंढारकरने या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे. चित्रपटातील सिद्धार्थ मोहिते या भूमिकेसाठी वैभवनं विशेष मेहनत घेतली आहे. वैभवनं या भूमिकेसाठी बॉडीबिल्डिंग केलं आहे. त्यासाठी त्याला प्रसाद शिर्के यांचं मार्गदर्शन मिळालं आहे. प्रसाद यांनी आजवर बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, उर्वशी रौतेला यांना बॉडीबिल्डिंग ट्रेनर म्हणून फिटनेसचे धडे दिले आहेत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment