मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Avadhoot Gupte: 'महाराष्ट्रातील पहिली बुलेट', रॉयल इन्फिल्डने राखला अवधूत गुप्तेच्या 'त्या' विनंतीचा मान,गायकासाठी केलं असं काही

Avadhoot Gupte: 'महाराष्ट्रातील पहिली बुलेट', रॉयल इन्फिल्डने राखला अवधूत गुप्तेच्या 'त्या' विनंतीचा मान,गायकासाठी केलं असं काही

अवधूत गुप्ते

अवधूत गुप्ते

आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या शुभ मुहूर्ताचं निमित्त साधत अनेक लोकांनी विविध नवनवे उपक्रम राबविले तर कलाकारांनी काही खास गोष्टी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 26 जानेवारी- आज देशभरात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या शुभ मुहूर्ताचं निमित्त साधत अनेक लोकांनी विविध नवनवे उपक्रम राबविले तर कलाकारांनी काही खास गोष्टी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मराठमोळा गायक, संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्तेसुद्धा यामध्ये मागे नाही. अवधूत गुप्तेने प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत एक मोठी खरेदी केली आहे. अवधूतने स्वतःसाठी बुलेट खरेदी केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ही पहिली बुलेट अवधूतला घेण्याचा मान मिळाला आहे.

ऐका दाजीबा, माझं कोल्हापूर या रांगड्या गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावणारा गायक म्हणून अवधूत गुप्तेला ओळखलं जातं. अवधूत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतो. आजही असंच काहीसं झालं आहे.अवधूत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यातील विविध अपडेट्स देत असतो. आजही अवधूतने एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

(हे वाचा:VIDEO: आकाश ठोसरला पाहून अचानक किंचाळू लागली वैदेही परशुरामी; नेमकं काय घडलं? )

इस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अवधूत गुप्ते रॉयल इन्फिल्डची खरेदी करतांना दिसून येत आहे. खास गोष्ट अशी की अवधूतला वोयाग मोटर्सची पहिली बुलेट मिळाली आहे. अवधूतने ही पोस्ट शेअर करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याची बुलेट आणि पोस्ट सर्वांनाच पसंत पडत आहे.

अवधूत गुप्ते पोस्ट-

''मित्रा.. तुला प्रजासत्ताक दिनाच्या 🇮🇳 हार्दिक शुभेच्छा!! बघ मला ह्या शुभमुहूर्तावर काय गोड बक्षिस मिळालंय!! @royalenfield ने #supermeteor650 चं बुकिंग ओपन करताच मी बुकिंग केलं आणि @voyagemotorsre ला गळ घातली की, महाराष्ट्रातली पहिली #bullet मला हवी!! आणि गंमत बघ.. #royalenfield ने सुद्धा माझी प्रेमाची विनंती मान्य केली!! ‘बुरुम बुरुम‘ ला मिळालेला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे, असं मी मानतो! थॅंक्यू''.

तसेच अवधूत गुप्तेने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु ज्यावेळी आपल्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या संपतील, जेव्हा गमवायला आणि मिळवायला काहीही उरलेलं नाही हे ठाम होईल तेव्हा मी राजकारणात येणार. माझ्या आयुष्यातील पाच वर्षे प्रामाणिकपणे मी राजकारणाला देणार असल्याचं अवधूतने सांगितलं आहे'.

First published:

Tags: Entertainment, Marathi entertainment