Home /News /entertainment /

‘माझा होशील ना’... सई-आदित्य पुन्हा एकत्र; चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

‘माझा होशील ना’... सई-आदित्य पुन्हा एकत्र; चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

‘माझा होशील ना’(Maza Hoshil Na) ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. मालिकेतील सई(Sai) आणि आदित्यच्या (Aaditya) जोडीने सर्वांना भुरळ पाडली होती.

  मुंबई, 7 सप्टेंबर- ‘माझा होशील ना’(Maza Hoshil Na) ही मालिका खूपच लोकप्रिय ठरली होती. मालिकेतील सई(Sai) आणि आदित्यच्या (Aaditya) जोडीने सर्वांना भुरळ पाडली होती. मालिकेने काही दिवसांपूर्वीच आपला निरोप घेतला आहे. मात्र तरीसुद्धा चाहत्यांना या मालिकेची जाम आठवण येते. सतत चाहते यातील कलाकारांना मिस करत असतात. आणि खास करून सई आणि आदित्यच्या जोडीला चाहते खूपच मिस करतात. नुकताच सई आणि आदित्यला पुन्हा एकत्र पाहण्यात आलं. या जोडीला एकत्र पाहून चाहते खूपच आनंदी झाले आहेत.
  सई अर्थातच गौतमी देशपांडे आणि आदित्य म्हणजेच विराजस कुलकर्णीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ते एकत्र दिसून येत आहेत. एका फोटोमध्ये सई आणि आदित्य आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मालिकेतील आदित्यचे सर्व मामादेखील आहेत. आदित्यने फोटो शेयर करत रियुनियन असं कॅप्शन दिल आहे. (हे वाचा: 'तारक मेहता..'च्या सोनूचा बोल्ड लुक; मालिकेनंतरही चर्चेत आहे अभिनेत्री) फोटो शेयर करताच, या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. चाहते आपल्या लाडक्या सई आदित्यला पुन्हा एकत्र पाहून खूपच आनंदी झाले आहेत. या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छादेखील व्यक्त करत आहेत. तसेच मालिका लवकर बंद केल्याची खंतसुद्धा व्यक्त करत आहेत. गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये हे सर्व मालिकेतील कलाकार सहभागी झाले होते.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

  पुढील बातम्या