मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बाप्पाच्या भेटीसाठी फक्त नारळ-पेढे नव्हे तर २ डोसही हवे'; पाहा 'चला हवा येऊ...'कलाकारांचा खास VIDEO

'बाप्पाच्या भेटीसाठी फक्त नारळ-पेढे नव्हे तर २ डोसही हवे'; पाहा 'चला हवा येऊ...'कलाकारांचा खास VIDEO

जिथे बघावं तिथं फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची घाई लागली आहे. प्रत्येक घराघरात बाप्पाच्या स्वागताची जंगी तयारी सुरु आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, ९ सप्टेंबर- 'चला हवा येऊ द्या' (Chala Hava Yeu Dya) शोचं नाव जरी घेतलं तरी, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हास्य खुलतं . यातील कलाकारांनी गणेशोत्सवाच्या(Ganesh Chaturthi 2021) पार्शवभूमीवर असाच एक मजेशीर पण सत्य सांगणारा व्हिडीओ बनवला आहे. ते पाहून तुम्हाला हसूही येईल आणि जबाबदारीची जाणीव ही होईल.

जिथे बघावं तिथं फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची घाई लागली आहे. प्रत्येक घराघरात बाप्पाच्या स्वागताची जंगी तयारी सुरु आहे. तसेच गेल्यावर्षीपासून कोरोना परस्थितीमुळे या उत्सवावर काहीशी बंधने आली आहेत. मात्र यावर्षी कोरोना नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोकणामधील गणेशोत्सव खूपच प्रसिद्ध आहे. दरम्यान कोकणातील काही मंडळी कामानिमित्त मुंबई किंवा इतर ठिकाणी स्थायिक झाले आहेत. मात्र गणेशोत्सवाला ते आपल्या गावी परत येत आहेत. मात्र येण्यापूर्वी नियमांप्रमाणे त्यांना कोरोना लशीचे दोन डोस पूर करणं गरजेचं आहे. यावरच आधारित एक मजेशीर व्हिडीओ 'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांनी बनवला आहे. ते पाहून सर्वांनाचा हसू आल्या शिवाय राहात नाहीय.

(हे वाचा:  अमृताला झाली बाप्पाच्या आगमनाची घाई; शेयर केला मजेशीर VIDEO)

या व्हिडीओमध्ये चाकरमानी कसे गावाला जाण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत हे दाखवलं आहे. भाऊ कदमसोबत अभय कलाकारांनी हा व्हिडीओ बनवला आहे. तसेच व्हिडीओला कॅप्शन देत म्हटलं आहे, 'यावेळी फक्त नारळ,अगरबत्ती आणि पेढेच घेऊन नाही तर दोन डोसपण घेऊन जायचंय'. हा व्हिडीओपाहून सर्वांना हसू येत आहे तसेच सध्य परिस्थितीची जाणीवदेखील होत आहे.

First published:

Tags: Marathi entertainment