Home /News /entertainment /

अपघातामुळे आशुतोष जाणार कोमात? अरुंधतीला होणार प्रेमाची जाणीव

अपघातामुळे आशुतोष जाणार कोमात? अरुंधतीला होणार प्रेमाची जाणीव

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक बनत चालली आहे. या मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. त्यामुळे प्रेक्षकही खिळून असतात. नुकतंच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.

  मुंबई, 10 मे-   'आई कुठे काय करते' मालिका  ( Aai kuthe kay karte )   सततच्या ट्वीस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतंच मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. त्यामुळे देशमुख कुटुंब अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण संजनानं आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला होता. या ट्विस्टनंतर मालिकेत आता पुन्हा एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आशुतोषचा मोठा अपघात झालेला दिसून येत आहे. यानंतर मालिका कोणतं नवं वळण घेणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक बनत चालली आहे. या मालिकेत दररोज नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. त्यामुळे प्रेक्षकही खिळून असतात. नुकतंच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये आशुतोषचा मोठा अपघात झालेलं पाहायला मिळत आहे. कार समोर एका वृद्ध व्यक्ती आल्याने त्यांना वाचवायचा प्रयत्नांत आशुतोषची कार एका भिंतीवर आदळते, त्यामुळे आशुतोषला मोठी दुखापत होते. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं आहे. याठिकाणी अरुंधती आणि यशसुद्धा पोहोचतात. आशुतोषचा अपघात झाल्याचं समजताच अरुंधतीला मोठा धक्का बसतो. अरुंधती जेव्हा डॉक्टरांकडे आशुतोषच्या तब्येतीची विचारपूस करते, तेव्हा डॉक्टर सांगतात की, त्याला डोक्यावर मोठा मार बसला आहे. आताच काही सांगता येत नाही, अशा परस्थितीमध्ये अनेक रुग्ण कोयता जाण्याची शक्यता असते. हे ऐकून अरुंधतीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता मालिकेत पुन्हा कोणतं नवं वळण येणार? आशुतोषचं काय होणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  दरम्यान आता अरुंधतीला आपलं आशुतोषवर प्रेम असल्याची जाणीव होत आहे. या अपघातामुळे अरुंधती आणि आशुतोष एक होणार? की आशुतोष अरुंधतीच्या आयुष्यातून कायमचा निघून जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या