मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Mazhi Tuzhi Reshimgath: जान्हवीनंतर नेहाचा मंगळसूत्र चर्चेत! तुम्ही पाहिली का हटके डिझाईन?

Mazhi Tuzhi Reshimgath: जान्हवीनंतर नेहाचा मंगळसूत्र चर्चेत! तुम्ही पाहिली का हटके डिझाईन?

कलाकार आणि चाहते यांचं एक अनोखं नातं आहे. त्यामुळेच चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टींची भुरळ पडत असते. मालिका असो किंवा सिनेमा कलाकार जो लुक कॅरी (Actors Look) करतात, तीच फॅशन म्हणून ओळखली जाते. मग त्यामध्ये हटके कपडे असो, हेअरस्टाईल असो किंवा दागिने.

पुढे वाचा ...

मुंबई, 1 जुलै-   कलाकार आणि चाहते यांचं एक अनोखं नातं आहे. त्यामुळेच चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टींची भुरळ पडत असते. मालिका असो किंवा सिनेमा कलाकार जो लुक कॅरी (Actors Look) करतात, तीच फॅशन म्हणून ओळखली जाते. मग त्यामध्ये हटके कपडे असो, हेअरस्टाईल असो किंवा दागिने. असाच काहीसा अनुभव सध्या मराठी मालिकांमधून येत आहे. सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath)  या मालिकेतील नेहाचा (Neha) मंगळसूत्र प्रचंड चर्चेत आला आहे.

झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अल्पवधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत सतत येणाऱ्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे प्रेक्षकसुद्धा खिळून आहेत. यामुळेच मालिका सतत टीआरपी रेसमध्ये टॉप 10 मध्ये सहभागी असते. मालिकेतील यश आणि नेहाची हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. शिवाय मालिकेतील चिमुकल्या परीने आपल्या गोंडस अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

मालिकेत नुकतंच यश (श्रेयश तळपदे) आणि नेहाचा (प्रार्थना बेहेरे) यांचा लग्नसोहळा पार पडला होता. त्यांनतर आता मालिकेत नेहाचा नवा लुक पाहायला मिळत आहे. हा लुक प्रेक्षकांना चांगलाच पसंत पडत आहे. शिवाय आणखी एका गोष्टीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे नेहाचं मंगळसूत्र. नव्या स्टाईलच्या या मंगळसूत्राने महिलावर्गाला भुरळ घातल्याचं सोशल मीडियावरून दिसून येत आहे. चोकरसारखं एकदम गळ्याबरोबर हे मंगळसूत्र बरंच चर्चेत आहे. यामध्ये पूर्ण काळ्या मन्या आणि मध्यभागी एक छोटासा सोनेरी खडा अशी याची डिजाईन आहे.

View this post on Instagram

A post shared by (@marathiserials_official)

(हे वाचा:सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घराची पहिली झलक आली समोर; दणक्यात पार पडला गृहप्रवेश )

काही वर्षांपूर्वी 'होणार सून मी या घरची' मालिकेतील जान्हवीचं मंगळसूत्रसुद्धा असंच चर्चेत आलं होतं.हे मंगळसूत्र तीनपदरी होतं. या डिझाईननेसुद्धा महिलावर्गाला भुरळ घातली होती. ही मालिकासुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मालिकेतील जान्हवी आणि श्रीच्या जोडीने तुफान पसंती मिळवली होती.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial