Home /News /entertainment /

आप्पांची नाराजी बेतणार कांचनच्या जीवावर?,'आई कुठे काय करते'मध्ये महाट्विस्ट

आप्पांची नाराजी बेतणार कांचनच्या जीवावर?,'आई कुठे काय करते'मध्ये महाट्विस्ट

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) ही मालिका पुन्हा एकदा रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत अरुंधतीसमोर (Arundhati) दररोज नवीन संकटे येऊन उभी राहतात. मात्र या सर्वांवर ती आत्मविश्वासाने मात करताना दिसते. दरम्यान आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 13 एप्रिल-   'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) ही मालिका पुन्हा एकदा रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत अरुंधतीसमोर (Arundhati) दररोज नवीन संकटे येऊन उभी राहतात. मात्र या सर्वांवर ती आत्मविश्वासाने मात करताना दिसते. दरम्यान आता मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये आप्पानीं माफ न केल्याने कांचन अर्थातच अरुंधतीच्या सासूची तब्बेत खालावली आहे. स्टार प्रवाहावरील बहुचर्चित मालिका 'आई कुठे काय करते' चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये कांचन बोलता-बोलता खाली कोसळते. त्यामुळे नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून आहे. सध्या हा नवा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरं तर, संजनाच्यानव्या डावामुळे अरुंधतीच्या घरात पुन्हा जोराचा वाद होतो. यावेळी अनिरुद्धची आई अर्थातच अरुंधतीची सासू आणि आप्पामध्येसुद्धा टोकाचा वाद पाहायला मिळाला होता. यावेळी कांचन आप्पांचं प्रचंड अपमान करतात. यावेळी बोलताना त्या म्हणतात, हे घर तुमचंसुद्धा नाहीय. तुमचं असं या घरात काय आहे. हे घर,, हे साम्राज्य माझ्या मुलाने म्हणजेच अनिरुद्धने उभं केलंय. त्यांच्या या बोलण्याने अरुंधतीसह सर्वानांच धक्का बसतो. त्यामुळे आप्पासुद्धा घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. ते अरुंधतीसोबत तिच्या घरी जातात.मात्र अनेक मार्गांनी प्रयत्न करून आप्पानां परत आणलं जातं.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, कांचन या आप्पांची हात जोडून माफी मागताना दिसून येत आहे. यावेळी त्यांनी आपलं चुकल्याचं कबुल केलं. मात्र या सर्व प्रकारामुळे आप्पांचं प्रचंड मन दुखावलं आहे. सध्या ते कांचन यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे ते त्यांना माफ न करताच निघून जातात. यांनतर कांचनला धक्का बसतो. आणि त्यांची प्रकृती बिघडते. त्या अचानक खाली कोसळतात. तर दुसरीकडे अरुंधतीला आईसोबत काही तरी वाईट झाल्याची चाहूल लागते आणि ती पळत घरी येते. तेथे तयाला अनिरुद्ध भेटतो. तो तिला विचारतो इतक्या रात्री अचानक का आली आहेस. अटीवर ती काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसते. ती थेट घरात पळत जाते. आता या सर्वांनंतर मालिकेत नेमका कोणता वळण येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या