मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO स्वीटू आणि नलूचा जबरदस्त डान्स, पाहा मायलेकीची ऑफस्क्रीन मस्ती

VIDEO स्वीटू आणि नलूचा जबरदस्त डान्स, पाहा मायलेकीची ऑफस्क्रीन मस्ती

 ‘येऊ कशी तशी मी नांदायला’(Yeu Kashi Tashi Mi Nnandayla) मालिकेतील कलाकरांची ऑफस्क्रीन मस्ती.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’(Yeu Kashi Tashi Mi Nnandayla) मालिकेतील कलाकरांची ऑफस्क्रीन मस्ती.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’(Yeu Kashi Tashi Mi Nnandayla) मालिकेतील कलाकरांची ऑफस्क्रीन मस्ती.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 2 जून- ‘येऊ कशी तशी मी नांदायला’(Yeu Kashi Tashi Mi Nnandayla) या मालिकेतील कलाकार मालिकेत जितके गंभीर आहेत. तितकेच ते रियल लाईफमध्ये बिनधास्त आहेत. मालिकेत स्वीटू (Sweetu)  आणि तिची आई नलू (Nalu) एकदम साध्या सोज्वळ दाखविण्यात आल्या आहेत. मात्र या दोघीही रियल लाईफमध्ये खूपच बोल्ड आणि बिनधास्त आहेत. या दोघी मायलेकींच्या डान्सचा एक धम्माल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ‘येऊ कशी मी नांदायला’ही मालिका खुपचं आवडीने बघितली जाते. ओम आणि स्वीटूच्या लव्हस्टोरीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. हे कलाकार ऑनस्क्रीन जितके चर्चेत असतात. तितकेच ऑफस्क्रीन सुद्धा. शुटींगच्या मध्ये जो रिकामा वेळ मिळतो तेव्हा हे कलाकार आपल्या आवडीच्या काही गोष्टी करत असतात. स्वीटू आणि नलू म्हणजेच अन्विता फलटणकर आंनी दीप्ती केतकर या दोघींनाही डान्सची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ह्या दोघी सतत मिळेल त्या वेळेत धम्माल डान्स करता असतात. आणि हे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर शेयर करत असतात. (हे वाचा:इरफान खानने टिपले होते बाबिलचे काही खास क्षण, पाहा PHOTO  ) नुकताच या दोघींचा एक धम्माल डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या दोघीही डान्स खुपचं एन्जॉय करताना दिसत आहेत. यावरून असं लक्षात येत की या दोघी फक्त उत्तम अभिनेत्रीचं नव्हे तर उत्तम डान्सरसुद्धा आहेत. (हे वाचा:टीना दत्ताने केला टॉपलेस फोटोशूट, संस्कारी सुनेचा बोल्ड अंदाज पाहून चाहते अवाक्  ) या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरून दाद मिळत आहे. चाहते दोघींचं कौतुकही करत आहेत. लाईक्स आणि कमेंट्स देऊन आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. नलू आणि सरू मालिकेमध्ये मायलेकी दाखविण्यात आलेल्या आहेत. तसेच मालिकेत या दोघींचा एकमेकिंवर खुपचं जीव आहे. ऑफस्क्रीनसुद्धा या दोघींची केमिस्ट्री खूपच सुंदर आहे.
First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial

पुढील बातम्या