झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असते.यामध्ये दोन अशा बालमैत्रींनींची कथा आहे. ज्या खूप वर्षानंतर एकमेकींना भेटतात. आणि त्यांची जुनी मैत्री नव्याने फुलते. अशातच नलूची मुलगी स्वीटू आणि शकूचा मुलगा ओम यांच्यात एक नवं नातं फुलतं. आणि त्यांची एक सुंदर लव्हस्टोरी सुरु होते. मात्र या दोघांच्या मध्ये असणारी आर्थिक दरी अनेकांना खटकू लागते. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही आपल्या नात्याला पुढ नेता येत नाही. असं काहीसं मालिकेचं कथानक सुरु आहे. (हे वाचा:सोनालीने घेतला Push Up चॅलेंज; VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम ) ओम आणि स्वीटू मध्ये फुललेल्या नव्या नात्यामुळे नलू काहीशी चिंतेत असते. कारण त्यांच्यामध्ये असणारी आर्थिक दरी कुठेतरी त्यांच्या नात्यावर परिणाम करेल असं तिला सतत वाटत असत. त्यामुळे ती शकू आणि ओमशी थोडीशी अंतर ठेऊन वागू लागते. मात्र तितकीच समजदार शकू आपल्या मैत्रिणीला धीर देण्यासाठी सतत नवनवीन गोष्टी करत असते. (हे वाचा:VIDEO: लवकरच येतोय 'समांतर 2' चा ट्रेलर; पाहा स्वप्नील जोशीची खास पोस्ट ) नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये नलूचं वाढदिवस असल्याचं दाखविण्यात आलं आहे. आणि शकुने तिला अतिशय सुंदर असं सरप्राईजसुद्धा दिलं आहे. शकू आपल्या गोड आवाजात गाणं म्हणत नलूला ओवाळते. शकूचं हे प्रेम पाहून स्वीटूचं संपूर्ण कुटुंब भारावून गेलं आहे. स्वीटू आणि ओमचं नातं आत्ता लग्नापर्यंत कस पोहचणार. नलू त्यांना परवानगी देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Zee marathi serial