मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO 'स्वीटू-ओमचा' एयरपोर्टवर रोमान्स, स्वीटूने दिली प्रेमाची कबुली

VIDEO 'स्वीटू-ओमचा' एयरपोर्टवर रोमान्स, स्वीटूने दिली प्रेमाची कबुली

 ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेमध्ये स्वीटू (Sweetu) आणि ओमच्या (Om) लव्हस्टोरीने नवं वळण घेतलं आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेमध्ये स्वीटू (Sweetu) आणि ओमच्या (Om) लव्हस्टोरीने नवं वळण घेतलं आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेमध्ये स्वीटू (Sweetu) आणि ओमच्या (Om) लव्हस्टोरीने नवं वळण घेतलं आहे.

मुंबई, 28 मे-  ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) मालिकेमध्ये स्वीटू (Sweetu) आणि ओमच्या (Om) लव्हस्टोरीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ओमच्या इतक्या प्रयत्नांनंतर स्वीटू आपलं प्रेम व्यक्त करणार की नाही? की ओम लंडनला परत जाणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. मात्र याचं उत्तर मिळालं आहे. स्वीटूने चक्क एयरपोर्टवर आपल्या प्रेमाची कबूली देत, ओमला लंडनला जाण्यापासून थांबवलं आहे.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये दाखवण्यात आलं आहे. ओम लंडनला जायला निघालेला असतो. तो एयरपोर्टवर सुद्धा पोहोचलेला असतो. मात्र आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी आणि ओमला थांबवण्यासाठी स्वीटू पळत एयरपोर्टवर येते. आणि सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देत, आणि ओमला थांबवते. 1 जूनला हा एपिसोड टीव्हीवर दाखवला जाणार आहे.

झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यातील स्वीटू आणि ओमच्या प्रेमाने तर चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडली आहे. मालिकेत हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. ओमने तर वेळोवेळी आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र या दोघांच्या मध्ये असणाऱ्या आर्थिक दरीमुळे स्वीटूच्या आईने तिला आपलं प्रेम व्यक्त करण्यापासून परावृत्त केलं होतं.

(हे वाचा:  VIDEO: मायावतींबाबत 'डर्टी जोक' करणं रणदीप हुड्डाला पडलं महागात, अटकेची मागणी)

त्याचबरोबर ओमच्या बहिणीने सुद्धा वेळोवेळी या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या सर्वांमध्ये स्वीटूने आपल्या प्रेमाचा त्याग केला होता. ओमने अनेक प्रयत्न करूनसुद्धा स्वीटूने आपलं प्रेम व्यक्त केलं नव्हतं. ‘ओमचे आतोनात प्रयत्न आणि स्वीटूचं काहीचं न व्यक्त होणं’ सध्या मालिकेत हेच कथानक चालू होतं.

(हे वाचा:HBD:'अभिनेता नव्हे तर दिग्दर्शक' म्हणून केली सुरुवात, मनिराज पवारचा अनोखा प्रवास )

आणि शेवटी निर्णय घेत ओम लंडनला जायला निघतो. त्यावेळी स्वीटूचा भाऊ तिला समजावतो. त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देतो. स्वीटू आपल्या आयुष्यातील किती महत्वाची व्यक्ती गमवायला निघाली आहे याची जाणीव करून देतो. आणि मग स्वीटू एयरपोर्टवर जाऊन आपल्या प्रेमाची कबुली देते. आणि ओमला लंडनला जाण्यापासून थांबवते.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment, Zee marathi serial