मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्वीटू-ओमच्या प्रेमाला Lockdown चा फटका; अंबरनाथमधील शूटिंग नेलं सिल्वासाला

स्वीटू-ओमच्या प्रेमाला Lockdown चा फटका; अंबरनाथमधील शूटिंग नेलं सिल्वासाला

 या मालिकेने नुकताच आपल्या शंभर भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे सिल्वासावरील सेटवर केक कापून आनंदसुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.

या मालिकेने नुकताच आपल्या शंभर भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे सिल्वासावरील सेटवर केक कापून आनंदसुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.

या मालिकेने नुकताच आपल्या शंभर भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे सिल्वासावरील सेटवर केक कापून आनंदसुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 30 एप्रिल- आपल्या आगळ्यावेगळ्या कथांकांनी मराठी मालिकेने(Marathi Serial)  प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. दिवसेंदिवस या मालिकांची क्रेझ वाढतचं चालली आहे. अनेक नवनवीन विषय मालिकेमध्ये मांडले जात आहेत. त्यामुळे या मालिका प्रेक्षकांना भुरळ घालत आहते. झी मराठी(Zee Marathi)  वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’(Yeu Kashi Tashi Mi Nandayla) या मालिकेने सुद्धा प्रेक्षकांमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. सासू आणि सुनेच्या मैत्रीपूर्ण नात्यावर ही मालिका आधारित आहे. मात्र अजून स्वीटू लग्नं होऊन सासरी जायची आहे. त्यामुळे सध्या ओम (Om)आणि स्वीटूची (Sweetu)  लव्हस्टोरी चांगलीचं चर्चेत आहे. अंबरनाथ मध्ये सुरु झालेली ही लव्हस्टोरी सिल्वासा पर्यंत कशी पोहचली चला पाहूया.

सध्या कोरोनाने देशभरात थैमान घातला आहे. आणि चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी मुंबईमधील सर्व शुटींग रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मालिकांनी आपल्या मनोरंजनात खंड न पडू देता, सर्व शुटींग महाराष्ट्राबाहेर हलवल्या आहेत. आणि म्हणूनच आपल्याला सर्व कथानकात आणि त्यांच्या मूळ स्वरुपात बदल दिसून येत आहे.

झी मराठीवर काही महिन्यांपूर्वीच ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेने एन्ट्री घेतली होती. बघता बघता या मालिकेने प्रेक्षकांना आपली भुरळ घातली होती. सासू आणि सुनेचं सुद्धा एक मैत्रीपूर्ण नातं असू शकतं हे यातून दाखविण्यात आलेलं आहे. मात्र मालिकेतील मुख्य अभिनेत्री स्वीटू अजून मुख्य अभिनेता म्हणजेच ओमशी लग्नं झालेलं नाहीय. मात्र या दोघांवर सध्या एकमेकांच्या प्रेमाचा जोरदार रंग चढला आहे. ओम हा एक अत्यंत श्रीमंत आणि उद्योजक आहे. तर दुसरीकडे स्वीटू ही एक मध्यमवर्गीय चाळीत राहणारी मुलगी आहे. या दोघांच्यामध्ये असलेली ही आर्थिक दरी पाहूनच स्वीटू ओमच्या प्रेमाला नाकारते. मात्र ओमने अजिबात माघार घेतलेली नाही. तो सतत स्वीटूचा होकार मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकंदरीत अशी ही कथा रंगवण्यात आली आहे.

(हे वाचा:दादासाहेब फाळकेंनी इतक्या हजारांत केला होता पहिला चित्रपट )

मात्र ही कथा मुंबईमध्ये सुरु झाली होती. स्वीटूही मुंबईमधील अंबरनाथमधील एका चाळीत राहते. आत्ता चक्क या कुटुंबाला सिल्वासा मधील एका तीन मजली इमारतीत आणण्यात आलं आहे. सर्व लॉकडाऊमुळे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईच्या अंबरनाथ मध्ये सुरु झालेली ही लव्हस्टोरी आत्ता सिल्वासामध्ये पुढे जाताना दिसणार आहे.

(हे वाचा: धनंजय माने नाव कसं सुचलं कसं?; पाहा ‘अशी ही बनवाबनवी’मधील भन्नाट किस्सा )

महत्वाचं म्हणजे या मालिकेने नुकताच आपल्या शंभर भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे सिल्वासावरील सेटवर केक कापून आनंदसुद्धा व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये शुभांगी गोखले, अन्विता फलटणकर, शाल्व किंजवडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. ओम स्वीटूला लग्नसाठी कसा तयार करणार, आणि त्यासाठी काय काय पापड लाटणार पाहणं औस्तुक्याचं ठरेल.

First published:

Tags: Lockdown, Maharashtra, Marathi entertainment, Zee Marathi