मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Yeu Kashi Tashi Mi Nandayala मालिका घेणार काही वर्षाचा लिप?; ओमच्या न्यू लुकवरून रंगली चर्चा

Yeu Kashi Tashi Mi Nandayala मालिका घेणार काही वर्षाचा लिप?; ओमच्या न्यू लुकवरून रंगली चर्चा

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ओमचा न्यू लुक समोर आला आहे त्यामुळे मालिका लिप घेणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ओमचा न्यू लुक समोर आला आहे त्यामुळे मालिका लिप घेणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ओमचा न्यू लुक समोर आला आहे त्यामुळे मालिका लिप घेणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

  मुंबई, 17 ऑक्टोबर : झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची (om and sweetu) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडते मात्र आवडली परंतु मध्येच मालिकेत एक असा ट्विस्ट आला त्यामुळे सर्वजण मालिकेचा तिरस्कार करू लागले. आता मालिका एका नव्या वळणावर आहे आणि लवकरच मालिकेत ओमचा नवा लुक ( om new look) पाहायला मिळणार आहे. ओमचा नवा लुक पाहून मालिका लिप घेणार का अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मालिकेत स्विटू आणि ओमच लग्न होणार होते. त्यांचा साखरपुडा, मेहंदी, हळद असे सगळे कार्यक्रम दाखवले होते. परंतु मध्येच मालविका म्हणजे ओमची बहीण लग्नाच्यावेळी ओमला लग्नाच्या मंडपातून बाहेर जाण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे स्विटूला मोहितसोबत लग्न करावे लागते. या सर्व प्रकारामुळे प्रेक्षक या मालिकेवर खूप भडकले होते.
  लग्नात ज्याच्याशी लग्न ठरले तो नाही आणि दुसरा मुलगा स्विटूसोबत लग्न करतो. तसंच पूर्ण लग्नात मुलीचा बाप उपस्थित नव्हता, हेदेखील कोणाच्या लक्षात आलं नाही, असे वेगवेगळे प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत होते. तसंच मालिकेचा लेखक काहीही लिहित आहे, असं म्हणत होते. आता या सगळ्यानंतर मालिकेचा पूर्ण टीआरपीच घसरला. त्यामुळे मालिकेकडे प्रेक्षकांना काहीअंशी पाठ फिरलवली आहे. वाचा : Bigg Boss Marathi 3 मुळे 'या' अभिनेत्रीला मोठा फटका ; हातातून गेला पहिला सिनेमा आता ही येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लवकरच काही वर्षाचा लिप घेणार असल्याचे समोर आले आहे. मालिकेचा टीआरपी खूप कमी आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद देत नाहीत. अशात मालिकेच्या लेखकाने मालिकेत काही वर्षाचा लीप घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओमचा नवा लुक देखील समोर आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मालिकेत काय बदल घडून येणार आहेत, तसेच मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करेल का, स्वीटू आणि ओम एकत्र येतील का याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials, Zee Marathi, Zee marathi serial

  पुढील बातम्या