मुंबई, 19 नोव्हेंबर : सध्या टीव्ही प्रेक्षकांमध्ये एकच हाॅट टाॅपिक आहे. तो म्हणजे विक्रांत सरंजामे आणि ईशाच्या नात्याचा. 'तुला पाहते रे' मालिकेत बऱ्याच उलथापालथी झाल्या.
मायरा तर ईशाच्या विरोधात उभी राहिलीय. तिनं विक्रांतच्या गैरहजेरीत ईशाला एका फ्राॅडमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय.ऐन वेळी विक्रांतची एन्ट्री होते आणि मायराचं खरं रूप समोर येतं. मायराचंही विक्रांतवर प्रेम असतं. त्यापायीच ती हे सगळे खेळ करत असते.
ईशा निमकर विक्रांतवर प्रेम करते, हे आता विक्रांतलाही माहीत आहे. पण विक्रांतचं ईशावर प्रेम आहे, हे फक्त तो झेंडेंना सांगतो. माझी सगळ्या जगाला ओरडून सांगण्याची तयारी असल्याचंही तो म्हणतोय. पण प्रश्न असा आहे की मालिकेतला हा हाय पाॅइंट कधी येणार? विक्रांत ईशाला त्याचं तिच्यावर प्रेम आहे, हे कधी सांगणार?
सूत्रांच्या माहितीनुसार विक्रांत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपलं मन ईशाजवळ मोकळं करणार. तो तिला थेट प्रपोझ करणार. त्या दिवशी महाएपिसोड ठेवणार आहेत. ईशा आणि विक्रांतच्या प्रेमामुळे तिच्या घरच्यांना बसलेला धक्का, आॅफिसमध्येही होणारी हलचल अशा बऱ्याच गोष्टी आता रंगणार आहेत.
ईशा-विक्रांतचं प्रेम, लग्न या घडामोडी मालिकेत सुरू होतीलच. पण आता विक्रांतचा भूतकाळही समोर येणार आहे. त्याबद्दल ईशाला अजून काहीच कल्पना नाहीय. प्रेक्षकांना धरून ठेवण्यासाठी मालिकेत बऱ्याच गोष्टी घडतील.
झी अॅवाॅर्डमध्ये 'तुला पाहते रे' मालिकेनं 9 पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार विक्रांत सरंजामेनं पटकावला. ईशा म्हणजे गायत्री दातारनं सर्वोत्कृष्ट चेहरा या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केलंय.सर्वोत्कृष्ट जोडी ठरलीय विक्रांत आणि ईशाची. तर 'तुला पाहते रे' मालिकाला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली.
Photos : राजस्थानच्या 'या' किल्ल्यावर होणार प्रियांका-निकचा संगीत सोहळा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Isha, Marathi serial, Vikrant saranjame