मुंबई, 27 मे- ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharali) ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील कलाकारांना ऑन स्क्रीन जितकं पसंत केल जातं, तितकचं ऑफ स्क्रीनसुद्धा. त्यामुळे हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकताच अभ्याने (Abhya) म्हणजेचं अभिनेता समीर परांजपेने (Sameer Paranjape) एक व्हिडीओ शेयर (Video) केला आहे. त्यामध्ये तो चाहत्यांना फिटनेस (Fitness) गोल देताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
नुकताच समीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. आणि त्यामध्ये तो पुशअप्स मारताना दिसून येत आहे. समीरचा हा फिटनेस फंडा चाहत्यांना खुपचं आवडत आहे. या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्स देत आहेत. समीरला छोट्या पडद्यावरील हँडसम हंक म्हणून ओळखलं जातं. अनेक तरुणी समीरच्या चाहत्या आहेत. त्यामुळे त्याच्या प्रत्येक पोस्टला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.
(हे वाचा: HBD: वडिलांकडून मिळाला अभिनयाचा वारसा, पाहा आशितोष गोखलेच्या काही खास गोष्टी )
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये सुद्धा अभ्याला फिटनेस कॉन्शीअस दाखवण्यात आलं आहे. मालिकेमध्ये सुद्धा अभ्या सतत एक्सरसाईज, रनिंग वेगेरे करताना दिसून येतो. त्यामुळे अभ्या आणि समीर जवळजवळ तसेच आहेत म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
(हे वाचा:आजी-नातीचा धम्माल डान्स; अभिनेत्री अदिती द्रविडचा हा VIDEO एकदा पाहाचं )
या मालिकेतील लतिका आणि अभ्याची केमिस्ट्री चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. शारीरिक सौंदर्याच्या पलीकडे जात मनाचे सौंदर्य बघत अभ्या लतीच्या प्रेमात पडला आहे. मात्र अजूनही त्याने लतीला याबद्दल सांगितलं नाहीय. कारण या दोघांच लग्न एकमेकांच्या इच्छेविरुद्ध झालं होतं. आणि म्हणून या दोघांनीही लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघे मालिकेत होणाऱ्या शर्यतीची वाट बघत होते. मात्र आत्ता अभ्याला हे लग्न हवं आहे. मात्र लतीजवळ आपलं प्रेम व्यक्त करण्याचं अभ्याचं अजूनही धाडस होतं नाहीय.
अभ्या लतीजवळ आपलं प्रेम व्यक्त करणार का, की त्यापूर्वीचं हे दोघे वेगळे होणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.