गौरीवर जयदीपच्या प्रेमाचा रंग चढला ; मालिकेत दिसणार नवी केमिस्ट्री

मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असत’(Sukh Mhanje Nakki Kay Asat) मध्ये लवकरच जयदीप (Jaydeep) आणि गौरीची (Gauri) लव्हस्टोरी फुलताना दिसून येणार आहे.

मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असत’(Sukh Mhanje Nakki Kay Asat) मध्ये लवकरच जयदीप (Jaydeep) आणि गौरीची (Gauri) लव्हस्टोरी फुलताना दिसून येणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 जून- मराठी मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असत’(Sukh Mhanje Nakki Kay Asat) मध्ये लवकरच जयदीप (Jaydeep) आणि गौरीची (Gauri) लव्हस्टोरी फुलताना दिसून येणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोवरून असचं काहीसं दिसून येत आहे. गौरीला जयदीपवर असलेल्या प्रेमाची जाणीव होतं आहे. त्यामुळे चाहतेसुद्धा जाम खुश झाले आहेत. जयदीप आणि गौरीची लव्हस्टोरी बघायलासुद्धा ते उत्सुक आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  स्टार प्रवाहवरील मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ सध्या प्रचंड लोकप्रिय होतं आहे. या मालिका टीआरपीच्या रेसमध्येही पुढ असल्याचं म्हटलं जात आहे. या मालिकेने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. ते पाहून प्रेक्षक जाम खुश झाले आहेत. कारण प्रोमोमध्ये माई गौरीला जाणीव करून देतात की जयदीपवर तिचं प्रेम आहे. आणि इतकचं नव्हे तर या गोष्टीची जाणीव जयदीपलासुद्धा करून देण्याचा सल्ला त्या गौरीला देतात. आत्ता गौरी जयदीपसमोर आपलं प्रेम व्यक्त कसं करणार आणि त्यावर जयदीपची काय प्रतिक्रिया असणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (हे वाचा:'अशी ही बनवा बनवी' गाण्यावर अज्याचा धम्माल डान्स; VIDEO होतोय VIRAL  ) ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री गौरी आणि अभिनेता जयदीप याचं लग्नं अगदी इच्छेविरुद्ध झालेलं असतं. मात्र दोघेही इतके समजूतदार असतात. की या नात्याला एखाद्या मित्राप्रमाणे निभावून घेतात. गौरी ही अशिक्षित साधी-सरळ अशी असते. तर दुसरीकडे जयदीप उच्चशिक्षित असतो. मात्र त्यांच्या मनाच्या मोठेपणामुळे त्यांची चांगली मैत्री जमते. इतकचं नव्हे तर जयदीपच्या घरातील काही लोक गौरीच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण करता असतात. मात्र जयदीप नेहमीच सत्याची बाजू घेत गौरीला सहकार्य करत असतो. आणि त्यातूनचं ते जवळ येऊ लागतात. आत्ता गौरी आपल्या प्रेमाची कबूली कशी देणार आणि जयदीपची त्यावर काय प्रतिक्रिया असणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: