• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘...म्हणून गौरी मला अधिक जवळची वाटते’; गिरीजानं सांगितलं आपल्या आईचं गुपित

‘...म्हणून गौरी मला अधिक जवळची वाटते’; गिरीजानं सांगितलं आपल्या आईचं गुपित

‘गौरी’(Gauri) म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने(Girija Prabhu) सुद्धा आपल्या आईबद्दलच्या काही गोड आठवणी सांगितल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 9 मे-  आज प्रत्येक कलाकार आपल्या आईसोबतच्या काही गोड आठवणी सांगत आहे. खरतर आईबद्दल जितकं सांगावं तितकं कमीच आहे. आई सोबतचे किस्से कधीही न संपणारे असतात. मात्र आज ‘मदर्स डे' (Mother's Day)  च्या निमित्ताने प्रत्येक कलाकार आईसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा देत आहे.’सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asat)  या मालिकेतील ‘गौरी’(Gauri)  म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभूने(Girija Prabhu)  सुद्धा आपल्या आईबद्दलच्या काही गोड आठवणी सांगितल्या आहेत.
  माध्यामांशी बोलताना गिरीजाने म्हटलं आहे, प्रत्येक व्यक्तीला आई ही सर्वात जवळची आणि सर्वात महत्वाची असते. आपल्या जन्माच्या आधीपासून ती आपल्याला ओळखते. आपल्या प्रत्येक निर्णयात ती आपल्याला साथ देते. गिरीजा म्हणते माझ्या आईमुळे मला अभिनय क्षेत्रात काम करायला हिम्मत मिळते. तिच्या कुटुंबातील ती पहिलच व्यक्ती आहे, जी या क्षेत्रात काम करते. त्यामुळे तिला आईचा खूप मोठा आधार आहे’. (हे वाचा:मराठमोळी रुचिता अडकली विवाहबंधनात; लग्नातील Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात  )
  गिरीजाने बोलताना एक महत्वाची गोष्टसुद्धा सांगितली आहे.’ गिरीजा सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करते. आणि या मालिकेत तिचा नाव ‘गौरी’ आहे. आणि तिच्या आईचं नावसुद्धा गौरीचं आहे. त्यामुळे गिरीजाला गौरीचं हे पात्र खुपचं आपलंसं वाटत. कारण तिच्या आईतले बरेच गुण या गौरीमध्ये सुद्धा आहेत. (हे वाचा: Mother's Day: पाहा बॉलिवूडच्या Super Mom; गर्भवती असतानाही करत होत्या काम) स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली चांगलीच पकड निर्माण केली आहे. मालिकेमध्ये गौरी अगदी साधी भोळी हो ला हो म्हणणारी अशी दाखवण्यात आली आहे. मात्र नुकताच यामध्ये गौरीचा मॉडर्न अंदाजही प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. यामध्ये गिरीजाचं काम चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. त्यामुळे गिरीजाने अगदी कमी वेळेत आपली चांगली ओळख निर्माण केली आहे
  Published by:Aiman Desai
  First published: