मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: गौरी करणार सायकलिंग; 'सुख म्हणजे..' मालिकेत अभिनेत्रीचा नवा अंदाज

VIDEO: गौरी करणार सायकलिंग; 'सुख म्हणजे..' मालिकेत अभिनेत्रीचा नवा अंदाज

स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रसारित होते.

स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रसारित होते.

स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रसारित होते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 3 जुलै- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asat) मालिकेतील गौरी (Gauri) आणि जयदीपची(Jaydeep) केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीचं पसंत पडते. मालिकेत सध्या गौरीला जयदीपवर असणाऱ्या प्रेमाची चाहूल लागली आहे. त्यामुळे ती सतत जयदीपजवळ आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही तिला यामध्ये यश मिळालेलं नाही. त्यामुळे ती विविध प्रयत्नाने जयदीपसोबत राहण्याचा प्रयत्न करत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये जयदीप सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला निघाला आहे. तर गौरीसुद्धा त्याला फॉलो करत आहे. मात्र गौरी चक्क सायकल घेऊन जयदीपला फॉलो करत असल्याचं दिसत आहे. गौरी आणि जयदीपची ही अनोखी केमिस्ट्री चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. या दोघांमध्ये खुलत असलेल्या या नव्या नात्याची सर्वांनाचं उत्सुकता लागली आहे. याआधीही माईच्या सल्ल्याने गौरीने जयदीपवर आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यात तिला अजूनही यश मिळालेलं नाही. गौरी जयदीपपर्यंत आपल्या भावना कशा पोहोचवणार आणि त्याला जयदीप कसा प्रतिसाद देणार याची दर्शकांना खुपचं उत्सुकता लागून राहिली आहे.

(हे वाचा:VIDEO: 'देवमाणसाची' इन्स्टाग्रामवरसुद्धा हवा; फॉलोअर्सचा आकडा वाढला  )

स्टार प्रवाहवर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रसारित होते. ही मालिका दर्शकांच्या पसंतीस उतरली आहे. सुरुवातीपासूनचं मालिकेने लोकप्रियता मिळवली आहे. साधी सरळ आणि आपल्याचं घरात घरकाम करत असणाऱ्या गौरीसोबत जयदीपने लग्न केलेलं असतं. माईच्या इच्छेसाठी गौरी आणि जयदीपने हे लग्न केलेलं असतं. त्यामुळे त्यांच्यात प्रेम ही भावनाचं नसते. मात्र हळूहळू या दोघांमध्ये मैत्रीचं नातं खुलतं आणि आत्ता मालिकेत यांच्या नात्यात प्रेमाची चाहूल लागली आहे. आत्ता हे दोघे कधी आपल्या प्रेमाची कबूली देतात यासाठी चाहते उत्सुक आहेत.

First published:

Tags: Marathi entertainment