गौरीने जयदीपसाठी घेतला उखाणा; VIDEO पाहून हसू आवरणं होईल कठीण

गौरीने जयदीपसाठी घेतला उखाणा; VIDEO पाहून हसू आवरणं होईल कठीण

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे

  • Share this:

मुंबई, 15 जून- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’(Sukh Mhanaje Nakki Kay Asat) या मालिकेने खुपचं लोकप्रियता मिळवलेली आहे. गौरी (Gauri) आणि जयदीपची (Jaydeep) केमिस्ट्री चाहत्यांना खुपचं भावते. त्यामुळे ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये सुद्धा पुढेच असते. सध्या गौरीचा एक मजेशीर उखाणा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं(Viral Video) आहे. गौरीने कुटुंबांसमोर जयदीपसाठी एक उखाणा म्हटला आहे. मात्र हा मजेशीर उखाणा ऐकून सर्वानाचं हसू आवरणं कठीण होतं.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. साधीभोळी गौरी आणि परदेशातून शिकून आलेल्या जयदीपची ही केमिस्ट्री आहे. चाहत्यांना ही केमिस्ट्री फारचं भुरळ पाडत आहे. जयदीपची वहिनी आणि इतर काही लोक गौरीला सतत काही ना काही त्रास देत असतात. प्रत्येकवेळी तिच्यासमोर अडचणी उभ्या करत असतात. मात्र जयदीप तिला खंबीरपणे साथ देत असतो.

(हे वाचा: अजिंक्य देव दिसणार शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत)

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. यामध्ये सर्व कुटुंब डायनिंग टेबलवर बसलेलं आहे. आणि गौरीला सर्वांसमोर उखाणा घ्यायला लावण्यात आलं आहे. त्यानंतर गौरी जो उखाणा घेते तो ऐकून सर्वजण मनसोक्त हसू लागतात. गौरीने म्हटलेला उखाणा असा आहे, ‘माई दादांच्या रुपात आईवडील मिळाले, नणंद जाऊ झाल्या बहिणी, दीर भावोजी झाले माझे भाऊ खास, लय भूख लागल्या जयदीपराव आता भरवा की मला घास’ गौरीच्या या उखाण्यानंतर सर्वांच्यात एकचं हश्या पिकतो.

(हे वाचा:लागीर झालं... फेम अज्याचा धम्माल डान्स, हा VIDEO एकदा पाहाच  )

या मालिकेमध्ये जयदीपने माईच्या आग्रहा स्तव गौरीशी लग्न केलेलं होतं. मात्र आत्ता मालिकेमध्ये हळूहळ गौरी आणि जयदीपमध्ये एक नवं नातं फुलू लागलं आहे. हे दोघेही एकमेकांच्या जवळ येत चालले आहेत. मात्र या दोघांना हेच प्रेम आहे हे कधी कळेल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Aiman Desai
First published: June 15, 2021, 5:41 PM IST

ताज्या बातम्या