VIDEO: रंग माझा...दीपाबद्दल कार्तिकचा पुन्हा गैरसमज; पाहा नेमकं काय घडलं

स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रक्षेपित होते. ही मालिका बरीच लोकप्रिय झाली आहे. रूपापेक्षा मनाची सुंदरता अधिक चांगली असते.हेच यामालिकेतून दाखविण्यात आलं आहे

स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रक्षेपित होते. ही मालिका बरीच लोकप्रिय झाली आहे. रूपापेक्षा मनाची सुंदरता अधिक चांगली असते.हेच यामालिकेतून दाखविण्यात आलं आहे

  • Share this:
    मुंबई, 22 जून- मालिकांमध्ये सतत काही ना काही ट्वीस्ट येत असतात ज्यामुळे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहते. असचं काहीसं आहे, ‘रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegala) या मालिकेचं. या मालिकेमध्येसुद्धा कार्तिक (Kartik) आणि दीपाच्या (Deepa) आयुष्यात बरेच ट्वीस्ट येत असतात. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढते. मालिकेच्या नवा प्रोमो व्हायरल होतं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पाहूया काय आहे हा प्रोमो.
    View this post on Instagram

    A post shared by Star Pravah (@star_pravah)

    स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रक्षेपित होते. ही मालिका बरीच लोकप्रिय झाली आहे. रूपापेक्षा मनाची सुंदरता अधिक चांगली असते.हेच यामालिकेतून दाखविण्यात आलं आहे. कार्तिक आणि दीपाची कथा सांगणारी ही मालिका आहे. या मालिकेमध्ये सध्या दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात गैरसमजाची वादळ येतच आहेत. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा कार्तिकला दीपाबद्दल गैरसमज झाल्याचं दिसून येतं. (हे वाचाVIDEO: 'माझा होशील ना', सईच्या मदतीसाठी आला डॅडा; मात्र घडलं भलतच:   ) यामध्ये दाखविण्यात आलं आहे. दीपा आणि सुजय एका रेस्टांरंटमध्ये आलेले असतात. मात्र रूपाला अचानक कसातरी वास येऊ लागतो. त्यात ती गर्भवती असते. त्यामुळे तिला तो वास सहन होतं नाही. तिला अस्वस्थ वाटू लागतं. ज्यावेळी ती उभ राहायचा प्रयत्न करते. तिला तोल सावरत नाही. आणि नकळत ती सुजयच्या खांद्यावर डोक टेकते. इतक्यात तिथे कार्तिक येतो. ते दृश्य पाहून कार्तिक पुन्हा भडकतो. दीपा आणि सुजयवर संशय घेतो. असं हा प्रोमो व्हायरल होतं आहे. (हे वाचा: पाहिले नं...मनूचा सुरेल अंदाज; तन्वी मुंडलेचा 'तो' VIDEO होतोय VIRAL  ) कार्तिकने आधीच दीपाला घराबाहेर काढलं आहे. दीपा ही गर्भवती आहे. ती कार्तिकच्या बाळाला जन्म देणार आहे. मात्र कार्तिकला मोठा गैरसमज होतो. आणि त्याला वाटू लागतं की हे दुसऱ्या कोणाचं तरी मुल आहे. आणि तो दीपाला घराबाहेर काढतो. दीपाने अनेक परीक्षा देवूनही कार्तिकला विश्वास बसलेला नाहीय. अशातच आत्ता पुन्हा एकदा त्याला गैरसमज झाला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published: