मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ढाले-पाटलांच्या घरात पुन्हा खाकी वर्दीची शान, PSI संजूची होणार धमाकेदार एन्ट्री

ढाले-पाटलांच्या घरात पुन्हा खाकी वर्दीची शान, PSI संजूची होणार धमाकेदार एन्ट्री

कलर्स मराठीवर ‘राजा राणीची ग जोडी’ ही मालिका प्रसारित होते.

कलर्स मराठीवर ‘राजा राणीची ग जोडी’ ही मालिका प्रसारित होते.

कलर्स मराठीवर ‘राजा राणीची ग जोडी’ ही मालिका प्रसारित होते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 जून- ‘राजा राणीची ग जोडी’ (Raja Rani chi Ga Jodi) मालिकेमध्ये तुमची लाडकी संजू म्हणजेच संजीवनी (Sanjeevani)  ढाले पाटील PSI बनून घरी परतली आहे. सध्या या मालिकेचे नवे प्रोमो रिलीज झाले आहेत. यामध्ये संजीवनी PSI बनून खाकी वर्दीमध्ये ढाले पाटलांच्या घरात आली आहे. संजूला पाहून पती रणजीतचा (Ranjit) उर अभिमानानं भरून आला आहे. आता यानंतर मालिकेला पूर्णविराम लागणार की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे.

कलर्स मराठीवर ‘राजा राणीची ग जोडी’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेमध्ये संजू आणि रणजीत यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. रणजीत हा PSI असतो. मात्र ज्यावेळी तो संजूशी लग्न करतो, तेव्हा संजूच वय अगदी कमी असतं. आणि ही गोष्ट रणजीतपासून लपवण्यात आलेली असते. मात्र एका वयात न बसणाऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचा ठपका ठेऊन रणजीतला त्याच्या नोकरीवरून निलंबित करण्यात येत. आणि त्यावेळी संजू त्याला वचन देते की ही खाकी वर्दी पुन्हा या घरामध्ये येणार.

(हे वाचा: हृतिक रोशनच्या डेब्यू वेबसिरीजला मनोज वाजपेयीचा नकार, वाचा काय आहे कारण  )

त्यानंतर संजू स्वतः PSI च्या तयारीला लागते. या काळामध्ये संजूवर अनेक संकटे येतात. रणजीतचे दादा, वहिनी संजूला आपल्या ध्येयापासून दूर करण्याचा आतोनात प्रयत्न करतात. अनेक अडचणी तिच्या वाटेत निर्माण करतात. मात्र रणजीतच्या खंबीर पाठींब्याने ती या सर्व अडचणींवर नेहमीच यशस्वी मात करते. असं एकंदरीत कथानक मालीकेमध्ये सुरु होतं.

(हे वाचा:या अभिनेत्रीमुळं मोडला करण-निशाचा संसार? इन्स्टा चॅटचे मेसेज होतायेत व्हायरल  )

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये संजू आणि सोबतच रणजीतच्या कष्टाचं चीज झाल्याचं दिसत आहे. संजू खाकी वर्दीमध्ये PSI होऊन ढाले पाटलांच्या घरी परतली आहे. संजूला खाकी वर्दीत बघून रणजीतचा उर अगदी भरून आला आहे. या व्हिडीओमध्ये रणजीत संजूला ओवाळत ढाले पाटलांच्या सात पिढ्यांचा मान उंचवलस म्हणतो. सध्या हा नवा प्रोमो खूपच चर्चेत आहे.

मात्र  संजू आणि रणजीतचं स्वप्न पूर्ण झालं. मग आता या मालिकेला पूर्णविराम लागणार की काय. किंवा मालिकेत कोणत नवं वळण येणार या चर्चासुद्धा सुरु आहेत.

First published:

Tags: Colors marathi, Marathi entertainment