मुंबई, 28 मे- ‘राजा राणीची ग जोडी’ (Raja Rani chi Ga Jodi) या मालिकेमुळे अभिनेता मनिराज पवारने(Maniraj Pawar) मोठी लोकप्रियता मिळवली आहे. यामधील एसीपी रणजीत ढाले पाटीलच्या (Ranjit Dhale Patil) रुपात तो महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे. त्याच्या रुबाबदार व्यक्तीमत्वानं चाहत्यांना भुरळ घातली आहे. आज हा अभिनेता आपला वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी.
मनिराज पवार हा मूळचा नाशिकचा आहे. त्याच्या जन्म 28 मे 1993 मध्ये औरंगाबादमध्ये झाला आहे. त्याचं शालेयशिक्षण तिथेच पूर्ण झालं. मात्र पुढील शिक्षणासाठी तो पुणे, मुंबई याठिकाणी राहिला आहे. मनिराजला सुरुवातीपासूनचं अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्याने पुण्यातील ‘ललित कला केंद्र’ मधून रीतसर अभिनयाचे धडे घेतले आहेत. त्यानंतर त्याने अभिनयासाठी मुंबई गाठली.
View this post on Instagram
फारच कमी लोकांना माहिती आहे की मनिराजने सुरवातीला दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. ‘आनंदाची बातमी’ हे दिग्दर्शक म्हणून त्याचं पहिलं नाटक होतं. त्यानंतर त्याने एका जाहिरातीमध्ये काम केल आहे. आणि नंतर त्याला ‘राजा राणीची ग’ जोडी ही मालिका मिळाली होती.
(हे वाचा:VIDEO: मायावतींबाबत 'डर्टी जोक' करणं रणदीप हुड्डाला पडलं महागात, अटकेची मागणी )
‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेने त्याला अभिनय क्षेत्रात खरी ओळख निर्माण करून दिली आहे. फारच कमी वेळात या मालिकेने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील एसीपी रणजीत ढाले पाटीलच्या व्यक्तिरेखेने चाहत्यांच्या मनावर त्याची एक वेगळी छाप पाडली आहे. त्याच्या रुबाबदार व्यक्तीमत्वाचे अनेक चाहते आहेत.
(हे वाचा:'मिस मॅच' फेम मराठमोळ्या मृण्मयी कोलवलकरचा हॉट फोटोशूट, PHOTO पाहून चाहते सैराट )
तसेच या मालिकेतील संजीवनी आणि रणजीतची जोडी चाहत्यांना खुपचं भावते. या दोघांचं प्रेम आणि त्यांच्यावर येणाऱ्या संकटांना तोंड देत एकमेकांसाठी खंबीर उभं राहणं, चाहत्यांना खुपचं पसंत पडतं. रणजीत ढाले पाटीलमुळे मनिराजला एक नवी ओळख मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment