मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

या मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याने उडवली घाबरगुंडी? नाशिकमधील घटना

या मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याने उडवली घाबरगुंडी? नाशिकमधील घटना

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...' ही देखील एकत्र कुटुंब पद्धतीचा विषय हाताळत आहे. प्रेक्षकांची पसंतीही या मालिकेला मिळत आहे. मात्र या सेटवरून आलेली एक बातमी प्रेक्षकांना धक्का देणारी आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नाशिक, 22 ऑक्टोबर: मराठी मालिकांचे चेहरेमोहरे पुन्हा एकदा (Marathi Serial News) बदलण्याचा प्रयत्न सर्व चॅनेल्सवर सुरू आहे. वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करू लागल्या आहेत. झी मराठीवर अलीकडेच सुरू झालेली मालिका 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...' (Tuzya Mazya Sansarala Ani kay Hawa) ही देखील एकत्र कुटुंब पद्धतीचा विषय हाताळत आहे. प्रेक्षकांची पसंतीही या मालिकेला मिळत आहे. मात्र या सेटवरून आलेली एक बातमी प्रेक्षकांना धक्का देणारी आहे. 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...'  या मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसल्याचे (Leopard at Marathi Serial Set) वृत्त समोर आले आहे. याठिकाणी मालिकेच्या सेटवर बिबट्याचा वावर असल्याचेही म्हटले होते. नाशिकमध्ये या मालिकेचं शुटिंग सुरू आहे. हे शुटिंग सुरू होण्याआधीही इथे बिबट्याचा वावर असल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान मीडिया अहवालांच्या मते याठिकाणी पोहोचलेला बिबट्या सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला होता. मात्र या सेटवर खरंच बिबट्या आला होता का याबाबत कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. वाचा-HBD: इन्वेस्टमेन्ट बँकिंगमध्ये करिअर करणारी परिणीती चोप्रा कशी बनली अभिनेत्री? दरम्यान या मालिकेत एक दृश्य असेही चित्रित करण्यात आले आहे की, ज्यात सिद्धार्थ म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी मालिकेतील त्याची सहकलाकार अदितीचं बिबट्यापासून संरक्षण करतो. हा भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता या सेटवर बिबट्या खरंच पोहोचला होता की हा एक चित्रिकरणाचा भाग होता हे स्पष्ट झालेले नाही. या मालिकेत एकत्र कुटुंब पद्धती आणि त्यामधील नाती यावर भाष्य करण्यात आले आहे. चाहत्यांच्या घरात राणा दा म्हणून घर केलेला हार्दिक जोशी त्याचप्रमाणे अभिनेत्री अमृता पवार या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत.
First published:

Tags: Marathi actress, Zee marathi serial

पुढील बातम्या