मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: आदित्यने सईला काढलं घराबाहेर, 'माझा होशील ना' मध्ये नवा ट्वीस्ट

VIDEO: आदित्यने सईला काढलं घराबाहेर, 'माझा होशील ना' मध्ये नवा ट्वीस्ट

 ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na)  मालिकेमध्ये सध्या खूपच तणावपूर्ण वातावरण आहे.

‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) मालिकेमध्ये सध्या खूपच तणावपूर्ण वातावरण आहे.

‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na) मालिकेमध्ये सध्या खूपच तणावपूर्ण वातावरण आहे.

मुंबई, 4 जून- ‘माझा होशील ना’ (Maza Hoshil Na)  मालिकेमध्ये सध्या खूपच तणावपूर्ण वातावरण आहे. सई(Sai) आणि आदित्यच्या(Aditya)  आयुष्यात सतत नवी संकटे येत आहेत. आदित्यने रागात घर सोडलं आहे. त्यामुळे सई आणि तो एका मध्यमवर्गीय वस्तीत राहत आहेत. आदित्यच्या हातात नोकरी नाहीय. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. अशातच सई उधारीवर किराणाचं साहित्य आणते. त्यामुळे आदित्य त्यच्यावर खवळतो.

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ ही मालिका लोक आवर्जून पाहतात. ब्रह्मे कुटुंबीयांचं एकमेकांवर असणारं प्रेम, सई आणि आदित्यची लव्हस्टोरी या सर्वच गोष्टी दर्शकांना भावतात. मात्र सध्या मालिकेत सर्वकाही वाईट घडत आहे. ब्रह्मे कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आहे, असचं म्हणावं लागेल. कारण दादा मामा आणि आदित्यमध्ये वाद निर्माण झाला आहे. आणि त्यामुळे आदित्यने आपलं घर सोडलं आहे. सध्या सई आणि आदित्य एका छोट्याश्या वस्तीमध्ये राहात आहेत. आदित्यची नोकरीसुद्धा गेली आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक चनचन भासत आहे.

(हे वाचा:'हा VIDEO माझ्यासाठी खुपचं खास', मानसी नाईकने शेयर केल्या लग्नाच्या आठवणी  )

नुकताच शोचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. त्यामध्ये सईने आदित्यसाठी सत्यनारायणाचा शिरा बनवला आहे. मात्र आदित्य विचारतो की घरी कोणतही साहित्य नसताना तू शिरा कसा बनवलास. यावर सई सांगते मी हे साहित्य समोरच्या दुकानातून उधारीवर आणलं आहे. यावर आदित्य प्रचंड चिडतो. आणि शिऱ्याची प्लेट भिरकावून देतो. सई त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र आदित्यच्या रागापुढे सर्वकाही शून्य होतं.

(हे वाचा: सोनममुळे अर्जुन कपूरने खाल्ला होता मार, वाचा या बहीण-भावाचा भन्नाट किस्सा )

आदित्य सईला बजावतो, एकवेळ भुकेल्या पोटाने झोपू मात्र कोणासमोर हात नाही पसरायचं. हे माझे संस्कार आहेत. ही माझी तत्वे आहेत. आणि सर्वकाही मला माझ्या दादा मामांनी शिकवलं आहे. त्यामुळे उधारीचा एकही घास या घरामध्ये परत येता कामा नये असं बजावून सांगतो. आणि रागाच्या भरात सईलासुद्धा घरातून बाहेर काढतो. आत्ता सई आणि आदित्यच्या नात्यामध्ये सुद्धा फुट पडणार की काय या विचाराने चाहते निराश झाले आहेत.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment, Zee marathi serial