मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सईचा जोरदार चौकार, पाहा गौतमीचा क्रिकेट खेळताना VIDEO होतोय VIRAL

सईचा जोरदार चौकार, पाहा गौतमीचा क्रिकेट खेळताना VIDEO होतोय VIRAL

‘माझा होशील ना’ मालिकेतील सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे क्रिकेटचा आनंद घेत आहे.

‘माझा होशील ना’ मालिकेतील सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे क्रिकेटचा आनंद घेत आहे.

‘माझा होशील ना’ मालिकेतील सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे क्रिकेटचा आनंद घेत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 जून-  शुटींगमधून (Shooting)  वेळ मिळाल्यानंतर प्रत्येक कलाकार आपला छंद जोपासत असतात. अभिनेत्री गौतमी देशपांडेसुद्धा(Gautami Deshpande) या मोकळ्या वेळेचा पुरेपूर वापर करून घेते. कधी ती गाणं म्हणताना दिसते, तर कधी डान्स करताना. मात्र आज गौतमी म्हणजेच तुमची लाडकी सई चक्क क्रिकेट खेळायला मैदानात उतरली आहे. सईचा हा व्हायरल व्हिडीओ(Viral Video)  चांगलाच पसंत केला जात आहे.

‘माझा होशील ना’ मालिकेतील सई म्हणजेच अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमीच आपल्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखली जाते. सेट असो किंवा खाजगी आयुष्य नेहमीच गौतमी आपल्या मस्तमौला अंदाजात असते. बऱ्याचवेळा ती आपल्या गाण्याचे व्हिडीओसुद्धा फावल्या वेळेत शेयर करत असते. आणि त्या व्हिडीओना मोठ्या प्रमाणात पसंतसुद्धा केलं जात. मात्र नुकताच गौतमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये गौतमी क्रिकेट खेळताना दिसत आहे. फक्त क्रिकेट खेळत नाहीय, तर चक्क चौकारसुद्धा मारत आहे. आणि सोबतच डान्स करून आपला आनंदही व्यक्त करत आहे.

(हे वाचा:ढाले-पाटलांच्या घरात पुन्हा खाकी वर्दीची शान, PSI संजूची होणार धमाकेदार एन्ट्री )

कलाकार सतत आपल्या शुटींगमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे बऱ्याचवेळा त्यांना आपला छंद जोपासता येत नाही. त्यामुळे बरेच कलाकार मिळेल त्या वेळेत आपल्या आवडी-निवडी जपत असतात. त्यातीलचं एक कलाकार म्हणजे गौतमी देशपांडे होय. गौतमी नेहमीच छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असते. गौतमी सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रीय असते. ती अनेक गोष्टी चाहत्यांशी शेयर करत असते. ती सोशल मीडियावर  मोठी लोकप्रियसुद्धा आहे. तसेच गौतमीच्या या व्हिडीओवरून तिला क्रिकेटची सुद्धा आवड असल्याचं समजतं.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment