लक्ष्मी, आर्वी आणि अबोली येणार एकमेकांसमोर, लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेत येणार नवं वळण

लक्ष्मी, आर्वी आणि अबोली येणार एकमेकांसमोर, लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेत येणार नवं वळण

मल्हारचं लक्ष्मीवर प्रेम आहे हे कळल्यानंतर अबोली मल्हार आणि लक्ष्मीला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आर्वी अचानक कुठे गायब झाली या मागचे कोडे देखील सुटणार आहे.

  • Share this:

मुंबई, १२ मार्च २०१९- कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये नुकतीच अबोलीची एण्ट्री झाली आहे. अबोलीची भूमिका केतकी चितळे साकारत असून तिच्या येण्याने लक्ष्मी, मल्हार आणि अजिंक्यच्या आयुष्यात बरेच बदल होणार आहेत. मल्हारचं लक्ष्मीवरचं वाढत प्रेम तसेच बायको म्हणून लक्ष्मीने त्याच्यासोबत सुखाचा संसार करावा अशी मल्हारची इच्छा लक्ष्मीला मात्र मान्य नाही. हे घडत असतानाच आता मालिका एका रंजक वळणावर येणार आहे.

लक्ष्मीची ताई म्हणजेच आर्वी मालिकेमध्ये लवकरच परतणार आहे. लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मी, आर्वी आणि अबोली या तिघी लवकरच एकमेकींसमोर येणार आहेत. पहिल्यांदाच या तीन नायिका एकमेकांसमोर येणार असून हे त्रिकूट एकत्र आल्यावर प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होणार हे नक्की.

अबोली लक्ष्मी आणि मल्हारचं बोलण ऐकते आणि तिला समजत की मल्हारच लक्ष्मीवर प्रेम आहे. मल्हारचं लक्ष्मीवर प्रेम आहे हे कळल्यानंतर अबोली मल्हार आणि लक्ष्मीला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकीकडे अबोली सगळी कारस्थानं करत असतानाच आर्वी देशमुख घरात लवकरच परतणार आहे. आर्वीच्या येण्याने लक्ष्मीचं आयुष्य बदलणार आणि त्यामुळे नात्यांचा गुंतादेखील वाढणार आहे. आर्वीच्या येण्याने मालिकेला एक वेगळेच वळण मिळणार आहे, या सगळ्यांची आयुष्य बदलणार हे नक्की...

तसेच आर्वी अचानक कुठे गायब झाली या मागचे कोडे देखील सुटणार आहे. या तिघींचा सामना झाल्यावर मालिकेमध्ये नक्की काय घडणार? कोणाचं आयुष्य बदलणार? लक्ष्मी येणाऱ्या अडचणीमधून कसा मार्ग काढणार? हे पाहणं रंजक असणार आहे. तेव्हा नक्की बघा लक्ष्मी सदैव मंगलम् सोम ते शनि संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

SPECIAL REPORT : शरद पवारांची माढ्यातून माघार, हे आहे कारण?

First published: March 12, 2019, 6:36 AM IST

ताज्या बातम्या