• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO: 'खुलता कळी खुलेना' ची 5 वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने शेयर केल्या खास आठवणी

VIDEO: 'खुलता कळी खुलेना' ची 5 वर्षे पूर्ण; अभिनेत्रीने शेयर केल्या खास आठवणी

या मालिकेमध्ये अभिनेत्री मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे आणि ओमप्रकाश शिंदे यांच्या मुख्य भूमिका होत्या.

 • Share this:
  मुंबई, 18 जुलै-  मराठीमध्ये अशा काही मालिका (Marathi Serial) आहेत, ज्या आजही प्रेक्षकांच्या ठळक लक्षात आहेत. ज्या मालिकांनी आजही चाहत्यांच्या मानत घर केलं आहे. यापैकीच एक मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’ (Khulta Kali Khulena) ही होय. ही मालिका खुपचं लोकप्रिय झाली होती. मानसी, मोनिका आणि विक्रांतच्या त्रिकुटने चाहत्यांना खुपचं भुरळ घातली होती. आज या मालिकेने 5 वर्ष (5 Year) पूर्ण केली आहेत. तसेच मालिकेतील क्लाकारांच्या मैत्रीलादेखील आज 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेत्री मयुरी देशमुखने एक खास व्हिडीओ शेयर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
  अभिनेत्री मयुरी देशमुखने नुकताच एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. यामध्ये ‘खुलता कळी खुलेना’ मधील अभिज्ञा भावे, ओमप्रकाश शिंदे हे कलाकारसुद्धा तिच्यासोबत आहेत. हा मजेशीर व्हिडीओ शेयर करत, तिने ‘खुलता कळी खुलेना’ सोबत हा वेडेपणा सुरु होऊन 5 वर्ष झाली असं म्हटलं आहे. ही मालिका 2017 मध्ये बंद झाली होती. मात्र आजही चाहत्यांना ती चांगलीचं आठवणीत आहे. ही मालिका झी मराठीवर रात्री 8.30 वाजता प्रसारित होतं होती. (हे वाचा:बोल्डनेसच्या बाबतीत ही मराठी अभिनेत्री देते भल्याभल्यांना टक्कर; शेयर केला PHOTO) या मालिकेमध्ये अभिनेत्री मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे आणि ओमप्रकाश शिंदे यांच्या मुख्य भूमिका होत्या. यामध्ये मानसी आणि ओमने एका डॉक्टरची भूमिका साकारली होती. या कलाकरांचं हे त्रिकुट चाहत्यांना खुपचं पसंत पडलं होतं. फक्त मालिकाचं नव्हे तर मालिकेचं शीर्षकगीतसुद्धा अतिशय लोकप्रिय झालं होतं. हे गीत प्रसिध्द गायिका श्रेया घोषालने गायिलं होतं. ‘मी पाहावे तू दिसावे’ असं या गीताचं नाव होतं. आज या मालिकेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. मालिका बंद झाली असली तरी, त्या मालिकेच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात तशाच आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: