मुंबई, 1 मे- मराठी अभिनेता (Marathi Actor) समीर खांडेकर(Sameer Khandekar) म्हणजेच’काहे दिया परदेस’ (Kahe Diya Pardes)फेम ‘वेणू’(Venu) ने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट(Video Post On Social Media) केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने आपल्या बिल्डींगचं बांधकाम व्यावसायिकाच्या अर्थातच बिल्डरच्या (Builder) भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवला आहे. समीर आणि त्याचं अपार्टमेंट गेली महिनाभर पाण्यासाठी तडफडत असल्याचंही त्याने म्हटलं आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण
समीरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यात म्हटलं आहे, ‘ आम्ही बोरीवली इस्टमधील ‘वृंदावन’ या अपार्टमेंटमध्ये राहतो. हे आमचं घर खुपचं सुंदर आहे. माझ्या जवळच्या सर्व लोकांना ते अतिशय आवडलं सुद्धा. खर सांगायचं तर हे घर आम्हाला 2017 मध्ये मिळणं अपेक्षित होतं. मात्र आमच्या बिल्डरने ते आम्हाला 2020 मध्ये दिलं. म्हणजे तब्बल 3 वर्ष उशिरा. या तीन वर्षात आम्ही घरासाठी खूप वणवण केली. भाड्याच्या घरात राहिलो. मात्र आत्ता घर मिळाल्यानंतर तर आमची समस्या संपली असं वाटतं होतं.
View this post on Instagram
मात्र नाही आमच्या बिल्डरला आम्ही सुखाने राहावं असं वाटतचं नसावं कदाचित, त्यामुळे एकापाठोपाठ एक नवीन समस्या आमच्या समोर उभ्या राहत आहेत.
लोक ऑक्सिजनसाठी तडफडत आहेत, आम्ही पाण्यासाठी-
तसेच बोलताना समीर म्हटलं आहे. एक महिन्यांपूर्वी BMC ने आमच्या अपार्टमेंटमधील पाण्याचं कनेक्शनचं कट केलं. याबद्दल आम्ही त्यांना जाब विचारलं असता. त्यांनी आम्हाला सांगितलं, की ही पाण्याची लाईन तुमची नव्हतीच. बिल्डरने चोरीचं कनेक्शन तुम्हाला दिलं होतं. त्यामुळे तुम्हाला ते वापरता येणार नाही. असं सांगत त्यांनी ते कनेक्शन कट केलं आहे. त्यामुळे गेली एक महिना आम्ही पाण्यासाठी तडफडत आहोत. कोरोना काळामध्ये लोक ऑक्सिजनसाठी तडफडत आहेत. आणि आम्ही पाण्यासाठी. आमच्या बिल्डरने मालमत्ता कर कितीतरि वर्षांपासून भरलेलाचं नाहीय. आणि ते भरल्याशिवाय आम्हाला पाणी मिळणार नाही. अपार्टमेंटमध्ये अनेक महिला गरोदर आहेत. वृद्ध लोकं, कोरोना पेशंट आहेत. अशांनी पाण्याअभावी काय करायचं असंही समीरनं म्हटलं आहे.
(हे वाचा: अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन, 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)
बिल्डरची ख्याती नंतर आम्हाला कळली-
आम्हाला याआधी बिल्डरबद्दल काहीही माहिती नव्हतं. मात्र BMC मध्ये वगैरे गेल्यानंतर आम्हाला समजलं की हा कसा माणूस आहे. आम्ही त्याची पोलिसांत तक्रार केली आहे. मात्र त्याच्यावर कोणताच उपाय लागू होतं नाहीय. शिवाय आम्ही अभिनेते अविनाश नारकर यांच्या माहितीतून आमचे खासदार गोपाळ शेट्टी यांचीही भेट घेतली आहे.
(हे वाचा:ट्रोल होताच आलिया भट्टनं सुरु केलं Social work; रुग्णांना अशी करतेय मदत )
आम्ही आम्हाला लागू होणारे सर्व कर भरत आलो आहोत. आणि यापुढे सुद्धा भरणार. मात्र जे कर बिल्डरवर लागू होतात. ते आम्ही का भरावे असं म्हणत समीरने बिल्डरवर आपला रोष व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, Marathi entertainment, Mumbai