'देवमाणूस'चं बिंग फुटणार का? ACP दिव्याच्या हाती लागला नवा पुरावा

'देवमाणूस'चं बिंग फुटणार का? ACP दिव्याच्या हाती लागला नवा पुरावा

सस्पेन्स मालिका नेहमीचं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. झी मराठीवर (Zee Marathi) प्रसारित होणारी ‘देवमाणूस’(Devmanus) या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे.

  • Share this:

मुंबई 7 मे  सस्पेन्स मालिका नेहमीचं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतात. झी मराठीवर (Zee Marathi)  प्रसारित होणारी ‘देवमाणूस’(Devmanus)  या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. या मालिकेत दररोज नवनवीन रोमांचित गोष्टी घडत असतात. त्यामुळेच प्रेक्षकांना एक उत्सुकता लागून राहिलेली असते. या मालिकेत आरोपी डॉक्टर म्हणजेच देवीसिंग (Devising)  दररोज एक पुरावा नष्ट करत आहे. तर दुसरीकडे ACP दिव्या(Acp Divya)  दररोज एखादा नवा पुरावा शोधून काढत आहे. असाच एक महत्वाचा पुरावा दिव्याच्या हाती लागला आहे. त्यामुळे आत्तातरी डॉक्टरचं बिंग फुटणार का असा प्रश्न दर्शकांना पडला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘देवमाणूस’ मध्ये आजपर्यंत डॉक्टरने म्हणजेच देवीसिंगने अनेक खून केले आहेत. अनेक निष्पाप जीवांचा नाहक बळी घेतला आहे. आणि याचा त्याला थोडा सुद्धा पश्चाताप नाहीय. उलट तो आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लोकांचा मागचा-पुढचा विचार न करता बळी घेतो. त्याचं हे चक्र अजूनही थांबलेलं नाहीय. मात्र आत्ता ACP दिव्याने देवी सिंगला पकडण्याचा निश्चयचं बांधला आहे. ती रात्रंदिवस एक करून देवीसिंग विरुद्ध पुरावे शोधते आहे.

(हे वाचा: मी आणि अंकुश होतो जुळे भाऊ', पाहा भरत जाधवच्या पहिल्या चित्रपटाचा भन्नाट किस्सा)

ACP दिव्याला आत्ता एक नवीन पुरावा सापडला आहे. देवीसिंगने प्रवासादरम्यान ज्या वृद्ध व्यक्तींचा बळी घेतला होता. त्याची काही कागदपत्रे देवीसिंगकडे होती. आणि तिच कागदपत्रे देवीसिंग विरुद्ध मोठा पुरावा होता. त्यामुळे त्याने मोठ्या चतुराईने ती कागदपत्रे जाळून टाकली. मात्र त्या कागदपत्राचा छोटासा तुकडा जळता-जळता राहून जातो. आणि तो दिव्याच्या हाती लागतो. त्या कागदावर त्या वृद्ध व्यक्तीचा फोटो असतो. आणि त्या कॉन्स्टेबलला ते ओळखत. यावरून दिव्या देवीसिंगच्या घरमालकाला विचारते, तेव्हा ते म्हणतात की हे तर डॉक्टरांच्या ओळखीचे आहेत. अशा पद्धतीने देवीसिंगचा खरा चेहरा समोर आणण्याचा मोठा पुरावा दिव्याच्या हाती लागलेला आहे.

(हे वाचा: मधुरा वेलणकर झळकणार थ्रीलर वेबसिरीजमध्ये, फर्स्ट लुक आला समोर...)

आत्ता हा पुरावा दिव्याला देवीसिंग पर्यंत घेऊन जायला मदत करेल, की त्याआधीचं डॉक्टर हा पुरावा नष्ट करेल का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नुकताच देवीसिंगने शेवटचा पुरावा असणाऱ्या एका हॉटेल कर्मचारी मुलाचा मोठ्या चतुराईने जीव घेतला होता. त्यामुळे या पुराव्याचं काय होणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

Published by: Aiman Desai
First published: May 7, 2021, 6:53 PM IST

ताज्या बातम्या