मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मालिकेचा शतकपूर्ती सोहळा असा रंगला; सुबोध-ऋजुताचा सेलिब्रेशन व्हिडीओ झाला तुफान VIRAL

मालिकेचा शतकपूर्ती सोहळा असा रंगला; सुबोध-ऋजुताचा सेलिब्रेशन व्हिडीओ झाला तुफान VIRAL

'कट्यार काळजात घुसली', बालगंधर्व अशा अभिनयाचा कस लावणाऱ्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे. त्याने आता नकारात्मक छटेची भूमिका 'चंद्र आहे साक्षीला'मधून छान वठवली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 4 मार्च: 'कट्यार काळजात घुसली', बालगंधर्व अशा अभिनयाचा कस लावणाऱ्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवलेला अभिनेता म्हणजे सुबोध भावे (Subodh Bhave Marathi serial). सुबोधने असंख्य मालिका, चित्रपटांतून ताकतीचा अभिनय केला आहे. नेहमीच वेगळ्या विषयांना हात घातला आहे.

असाच वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणला तो 'चंद्र आहे साक्षीला' (Chandra Ahe sakshila marathi serial) या मालिकेच्या माध्यामतून. आपल्या अभिनयाच्या जोरावर तो खलनायक म्हणूनही श्रेष्ठ वाटू लागला आहे. कलर्स मराठीवर प्रसारित होणारी मालिका 'चंद्र आहे साक्षीला' हिने आज 100 भाग पूर्ण केले आहेत. त्यामुळे मालिकेच्या सर्व लोकांनी मिळून याच जंगी सेलेब्रेशन सुद्धा सेटवर केलं आहे. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

" isDesktop="true" id="527479" >

चंद्र आहे साक्षीला' मालिकेने प्रेक्षकांसमोर एक वेगळा विषय मांडला.  'आपल्या बायकोला मुल होत नाही. म्हणून बायकोच्या हट्टापायी फक्त बाळासाठी  एका सर्वसाधारण घरातील मुलीशी लग्न करून नंतर तिला सोडून द्यायचं मात्र हा कट मध्येच फसतो'. अशी ही वेगळ्या धाटणीची मालिका प्रेक्षकांसमोर आणली. या मालिकेच्या  माध्यमातून  समाजातील एक वेगळी मानसिकता दिसून आली. या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे, अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं. तिनंही तितक्याच ताकतीनं आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे. सोबतीला बाकी मंडळीही आहेतच. या सर्वांनी मिळून मालिकेच्या 100 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यातून प्रेक्षकांचं त्यांच्यावर असणारं प्रेम दिसून येतां.

याआधी सुबोध भावेची 'तुला पाहते रे' ही मालिकाही प्रचंड प्रसिद्ध झाली होती. प्रेक्षकांनी त्या मालिकेला भरभरून दाद दिली होती. तर ऋतुजा बागवे हिनं याआधी 'नांदा सौख्यभरे' या मालिकेतून चाहत्यांची मनं जिंकली होती. त्यानंतर आता ते 'चंद्र आहे साक्षीला' च्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत.

First published:

Tags: Marathi entertainment, Tv serial