झी मराठीवर ‘अग्गबाई सूनबाई’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अगदी कमी वेळेत या मालिकेने आपली चांगली पकड प्रेक्षकांच्या मनावर निर्माण केली आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. (हे वाचा: आई कुठे काय करते'ची अनघा झाली कित्येकांची 'माय'; अश्विनीचं कौतुकास्पद काम) प्रोमोमध्ये दाखविण्यात आलं आहे. शुभ्राचा तुटलेला मंगळसूत्र सुजैन दुरुस्त करून आणते. त्यामुळे शुभ्रा तिचे आभार मानते आणि पुढे तिला वॉर्न सुद्धा करते. शुभ्रा सुजैनला म्हणते, जेव्हा तू माझ्या नवऱ्याला म्हणजेच सोहमला जेव्हा माझ्यापासून दूर करतेस तेव्हा तू आई, बाबा, आजोबा आणि त्याच्या मुलापासून देखील त्याला दूर करतेस. अर्थातच सोहमचं या सर्वांशी देखील नातं आहे. त्याच्या वागण्याचा यांच्यावर देखील परिणाम होतो. त्यामुळे तुला जे हवं ते माग, फक्त सोहमला सोडून अशी चेतावणी शुभ्रा सुजैनला देते. (हे वाचा:अद्वैत दादरकर कसा झाला बबड्या? पाहा अष्टपैलू अभिनेत्याचा प्रेरणादायी प्रवास ) त्यामुळेचं शुभ्राने मालिकेत पत्नीरूप धारण केलेलं दिसत आहे. ती आपल्या नवऱ्याला आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. कितीही मोठ्या संकटाचा सामना करायला देखील तयार आहे. म्हणजेच येत्या काही भागांमध्ये शुभ्रा आपला मोडलेला संसार वाचविण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करताना दिसून येणार आहे. आत्ता यामध्ये शुभ्रा बाजी मारणार की सुजैन त्याच्या खुरापतीत यशस्वी होणार हे प्रत्यक्ष मालिके मध्येच बघायला मिळणार.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.