Home /News /entertainment /

पाहा मराठी कलाकारांचे आगळे वेगळे Video; स्वीकारलं ‘साऊथ डान्स चॅलेंज’

पाहा मराठी कलाकारांचे आगळे वेगळे Video; स्वीकारलं ‘साऊथ डान्स चॅलेंज’

एक नवं चॅलेंज सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत चर्चेत आहे. या चॅलेंजला ‘साऊथ डान्स चॅलेंज’ (south dance challenge) असं म्हटलं जात आहे.

  मुंबई 14 मार्च: सोशल मीडियामुळं अनेक सर्वसामान्य लोक रातोरात प्रकाशझोतात येत असल्याचं आपण पाहात आहोत. त्यामुळं आता जवळपास सर्वच कलाकार चर्चेत राहण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. (Marathi serial) ते सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करतात. शिवाय ‘पिलो चॅलेंज’, ‘फ्लिप द स्विच चॅलेंज’, ‘आईस बकेट चॅलेंज’, ‘डूडल चॅलेंज’ यांसारखी विविध आव्हानं स्विकारतात. अन् चाहत्यांसाठी ती पूर्ण देखील करतात. (dance challenge) असंच एक नवं चॅलेंज सध्या मराठी मनोरंजनसृष्टीत चर्चेत आहे. या चॅलेंजला ‘साऊथ डान्स चॅलेंज’ (south dance challenge) असं म्हटलं जात आहे. यामध्ये मराठी कलाकार मंडळी दाक्षिणात्य चित्रपटांतील गाण्यांवर त्यांच्याच शैलीत डान्स करताना दिसत आहे. मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी या अनोख्या स्पर्धेत हिरिरिनं भाग घेतला आहे. अवश्य पाहा - अभिज्ञानं केली ब्रिटनच्या राजकुमारीची नक्कल?; रॉयल PHOTO होतायेत व्हायरल ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील श्वेता आणि कार्तिक म्हणजेच अनघा अतुल आणि आशुतोष गोखले यांनी सहभाग घेतला. पडद्यावर या दोघांचं फार पटत नसलं तरी पडद्यामागची या दोघांची केमेस्ट्री खरोखर लक्ष वेधून घेणारी आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Aashutosh Gokhale (@aashu.g)

  ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील ढवळे मामी म्हणजेच किशोरी अंबिये सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. त्यांनी देखील सरू, अंजी आणि अवनीसोबत या हटके गाण्यावर आपल्या हटके अंदाजात ठेका धरला.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील गौरी म्हणजेच गिरीजा प्रभूने आपल्या सहकलाकारांसोबत ठेका धरला.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील दिव्या देखील यात मागे नव्हती. व्हिडीओमधील तिच्या सोज्वळ अंदाज पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  मराठी मालिकांमध्ये झळकणाऱ्या या सर्व कलाकारांच्या व्हिडीओजला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हजारो नेटकऱ्यांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Dance video, Marathi entertainment, Social media viral, Zee marathi serial

  पुढील बातम्या