Home /News /entertainment /

VIDEO: 'आई कुठे काय करते', अरुंधतीला मिळणार यश, तर संजनाला येणार अपयश; पाहा मालिकेत रंजक वळण

VIDEO: 'आई कुठे काय करते', अरुंधतीला मिळणार यश, तर संजनाला येणार अपयश; पाहा मालिकेत रंजक वळण

छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'आई कुठे काय करते' ही खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे.

  मुंबई, 14 सप्टेंबर- 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karate) मालिकेत सध्या अरुंधतीच्या वाट्याला काही सुखद गोष्टी येत असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे संजनाच्या हातातून हळूहळू सर्वकाही सुटत चालल्याचं दिसत आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये हे चित्र पाहायला मिळालं होतं. पाहूया नेमकं काय घडलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  छोट्या पडद्यावरील मराठी मालिका 'आई कुठे काय करते' ही खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत एका आईचं भावविश्व् रेखाटण्यात आलं आहे. एका आईला आपल्या अस्तित्वसाठी किती लढा द्यावा लागतो हे यात दाखवण्यात आलं आहे. (हे वाचा:सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कशी आहे शेहनाजची अवस्था? अभिनव शुक्लाने दिली माहिती) सध्या मालिकेत अरुंधतीला एक गाणं गाण्यासाठी संधी मिळाली होती. अरुंधतीने या संधीचं सोनं केलं आहे. तिने यशस्वीपणे आपल्या गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण केलं आहे. शिवाय तिला यासाठी पहिलं मानधनही देण्यात आलं आहे. त्यामुळे घरात आनंदी वातावरण आहे. तर दुसरीकडे संजनावर बेरोजगारीची वेळ आली आहे. तिचासुद्धा एकेठिकाणी इंटरव्यूव्ह होतो. मात्र तिला काही दिवस घरीच थांबण्यास सांगितलं जात. याआधी अनिरुद्धवरसुद्धा बेरोजगारीची वेळ आली आहे. (हे वाचा:HBD: आयुष्मान नव्हे तर हे होतं बॉलिवूड अभिनेत्याचं खरं नाव) या मालिकेमध्ये आई म्हणजे अरुंधती आपल्या हक्कासाठी, अस्तित्वसाठी झगडत आहे. अरुंधतीचा पती तिला कायम एक गृहिणी म्हणून कमी लेखत असतो. यातच तो एका परस्त्रीच्या प्रेमात पडतो. त्याच स्त्रीचं नाव संजना असं आहे. आत्ता तीसुद्धा अनिरुद्धशी लग्न करून घरात आली आहे. तर अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र अरुंधती आपल्या मुलांसाठी आणि सासू-सासऱ्यांसाठी त्याच घरात राहात आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या