• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO:'आई कुठे काय..'विशाखा-अविमुळे अरुंधतीच्या डोळ्यात पाणी; नेमकं काय घडलं?

VIDEO:'आई कुठे काय..'विशाखा-अविमुळे अरुंधतीच्या डोळ्यात पाणी; नेमकं काय घडलं?

स्टार प्रवाहवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या मालिकेला दर्शकांची मोठी पसंती मिळते.

 • Share this:
  मुंबई, 23 जुलै- ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) ही मालिका सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहे. मालिकेत दररोज येणारे नवे ट्वीस्ट चाहत्यांना आकर्षित करून घेत आहेत. मालिकेतील अरुंधतीचा (Arundhati) स्वाभिमान आणि संजनाचा हट्ट यामुळे येणारे नवनवीन टर्न चाहत्यांना खुपचं आवडत आहेत. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. मात्र यामध्ये अरुंधतीला संजनाने नव्हे तर विशाखा आणि अविनाशने रडवलं आहे. पाहूया नेमकं काय घडलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  स्टार प्रवाहवर ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रसारित होते. या मालिकेने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. या मालिकेला दर्शकांची मोठी पसंती मिळते. त्यामुळे मालिका टीआरपीच्या रेसमध्येसुद्धा पुढे दिसून येते. मालिकेत अरुंधतीची जागा संजना घेण्याचा प्रयत्न करत आहे. काही प्रमणात ती यात यशस्वीसुद्धा झाली आहे. संजनामुळे अरुंधतीला स्वतःच्याच घरातून बाहेर पडावं लागलं होतं. आणि स्वतः च्या मुलांपासून दुसर राहावं लागलं होतं. हे सर्व एकीकडे सुरू असताना, दुसरीकडे मात्र अरुंधतीला आनंदाश्रू येत आहेत. (हे वाचा: सैराट झालं जी..आर्ची-परश्या पुन्हा एकत्र! फोटोंची होतेय चर्चा) नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये आता अविनाश आपल्या घरी परत आलेला दाखवण्यात आलं आहे. यावेळी विशाखा आणि अविनाश या बहीणभावामध्ये खुपचं भावनिक संवाद होतो. विशाखा अविनाशला आत्ता परत त्यांच्यापासून दूर न जाण्याची विनंती करते. तर अविनाशही येत्या रक्षाबंधनला राखी बांधण्यासाठी आपण नक्की विशाखाजवळ घरी येणार असल्याचं सांगतो. आणि याचंवेळी अरुंधतीदेखील त्यांचं बोलणं ऐकत असते. आणि या दोघा बहीण भावाचं प्रेम पाहून अरुंधतीच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊ लागतात.
  Published by:Aiman Desai
  First published: