Home /News /entertainment /

'आई कुठे काय करते'ची अनघा झाली कित्येकांची 'माय'; अश्विनी महांगडेचं कौतुकास्पद काम

'आई कुठे काय करते'ची अनघा झाली कित्येकांची 'माय'; अश्विनी महांगडेचं कौतुकास्पद काम

'आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) मधील ‘अनघा’ (Angha) अर्थातच अश्विनी महांगडेने (Aashwini Mahangade) कोरोना काळात सामाजिक भान राखत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

  मुंबई, 05 मे-  कोरोनाचा (Coronavirus)  विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनचा (Maharashtra Lockdown) पर्याय देखील अवलंबण्यात आला आहे. तसंच देशाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज पडत आहे. अशामध्ये अनेक बॉलिवूड कलाकार मदतीसाठी धाव घेत आहेत. सोनू सूदपासून ते अजय देवगणपर्यंत अनेक कलाकारांनी अमूल्य मदत केली आहे. तर दुसरीकडे मराठी कलाकारसुद्धा मदतीच्या बाबतीत पाठीमागे नाहीत. होईल त्या पद्धतीने हे कलाकार लोकांपर्यंत आपली मदत पोहचवत आहेत. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) मधील ‘अनघा’(Angha) अर्थातच अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade)  ही अन्नादानासारखं श्रेष्ठ काम करत आहे. त्यामुळे तिचं कौतुक करावं तितकं कमी आहे.
  स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये अनघा या भूमिकेने लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे. ती अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच मात्र माणूस म्हणून सुद्धा किती सुंदर आहे, याची प्रचिती कोरोना काळात येत आहे. अश्विनीने 2 वर्षांपूर्वी ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ ची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानअंतर्गत ती विविध गरजू लोकांना मदतीचा हात देते.
  सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सध्याची परिस्थिती नकारात्मक बनली आहे. अशा काळात माणुसकी जपणं खूप मोठी गोष्ट आहे. हीच माणुसकी जपत अभिनेत्री अश्विनीने कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्न देण्याचा वसा घेतला आहे. असं म्हणतात की, माणसाला सर्व सहन होतं मात्र भूक नाही त्यामुळेच या गरजू लोकांच्या तोंडात अन्नाचा घास भरवण्याचा अश्विनीचा हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. हे वाचा - 'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री रुचिता जाधव अडकली लग्नबंधनात.... पाहा PHOTO ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ या अंतर्गत हे सामाजिक कार्य केलं जात आहे. खंडाळा, फलटण, शिरवळ, सातारा, केसुर्डी अशा अनेक शहरांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. अश्विनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये सर्व शहरांची आणि मोबाईल नंबरची यादी आहे. त्यामुळे आवश्यक त्या लोकांना संपर्क साधता येईल. हे वाचा - धक्कादायक! कोरोना बळींचं सत्र सुरूचं, 'बापमाणूस' फेम अभिलाषा पाटीलचं निधन... ‘आई कुठे काय करते’ आधी अश्विनीने ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे’ मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेत ती ‘राणू आक्कासाहेब’ या भूमिकेत होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली होती.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Coronavirus, Instagram post, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या