मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रुपाली भोसलेचा Before & After लुक पाहून चाहते अवाक्; पाहा VIRAL PHOTO

रुपाली भोसलेचा Before & After लुक पाहून चाहते अवाक्; पाहा VIRAL PHOTO

 अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) ही बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 2)  सिझन 2 मधून घराघरात पोहोचली आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) ही बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 2) सिझन 2 मधून घराघरात पोहोचली आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) ही बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 2) सिझन 2 मधून घराघरात पोहोचली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 9 जून- अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) ही बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 2)  सिझन 2 मधून घराघरात पोहोचली आहे. सध्या ती ‘आई कुठे काय करते?’(Aai Kuthe Kay Karate) या मालिकेमधून सर्वांना भुरळ पाडत आहे. या मालिकेतील तिची ‘संजना’ ही व्यक्तिरेखा सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. आज एकदम स्टाईलिश मॉडर्न दिसणारी रुपाली भोसले आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये मात्र फारच साधी होती. तिने नुकताच आपला थ्रोबेक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. तो फोटो पाहून चाहते खरच आश्चर्यचकित झाले आहेत.

‘आई कुठे कुठे काय करते?’ मधील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बोल्ड आणि स्टाईलिश अभिनेत्री समजली जाते. मात्र मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी रुपाली कशी होती. हे कोणालाच माहिती नाही. नुकताच रुपालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये रुपालीने अफ्टर-बिफोर असे दोन फोटो शेयर केले आहेत.

(हे वाचा: सोनाली-कुणालने दिला Fitness Goal, सगळीकडे होतेय VIRAL VIDEO ची चर्चा )

आधीच्या फोटोमध्ये रुपाली साडी आणि एकदम पारंपरिक रुपात आहे. त्यामध्ये ती खूपच साधी आणि सोज्वळ दिसत आहे. तर आत्ताच्या फोटोमध्ये ती रेड कलरच्या वेस्टर्न गाऊनमध्ये आहे. त्यात ती खूपच बोल्ड आणि स्टाईलिश दिसत आहे. या दोन्ही फोटोंमध्ये खुपचं मोठा फरक जाणवत आहे. रुपालीने स्वतःवर खुपचं मेहनत घेतलेली या फोटोंवरून दिसून येत आहे.

(हे वाचा:थाटामाटात बांधली होती आंतरधर्मीय लग्नगाठ;आता लग्नच अवैध म्हणते नुसरत जहाँ  )

हा फोटो पाहून चाहते रुपालीचं कौतुक करत आहेत. अनेक कमेंट्स आणि लाईक्ससुद्धा या फोटोला मिळत आहेत. एका युजरने कमेंट करत म्हंटल आहे, ‘मला वाटत होतं तू शहरी मुलगी आहेस. मात्र हा फोटो बघून मला समजलं की तू एक ग्रामीण मुलगी आहेस जिने स्वतःच्या बळावर इतकं यश मिळवलं आहे. तुला बघून आज अभिमान वाटत आहे’. रुपालीच्या या फोटोवर अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment