कसा आहे 'सैराट'चा रिमेक 'मनसू मल्लिगे'?

कसा आहे 'सैराट'चा रिमेक 'मनसू मल्लिगे'?

मराठी सैराटचा कन्नड रिमेक असलेला मनसू मल्लिगे हा नुकताच कर्नाटकात रिलीज झालाय.

  • Share this:

08 एप्रिल : मराठी सैराटचा कन्नड रिमेक असलेला मनसू मल्लिगे हा नुकताच कर्नाटकात रिलीज झालाय. तिकीटबारीवरही त्याला बऱ्यापैकी प्रसिसाद मिळतोय.

सैराटमधला आर्चीचा 'हा मी एकटीच शेतात चालले' हा डॉयलाग आपण सर्वांनी ऐकलाच असेल.पण यावेळी आपली मराठमोळी आर्ची शेतात नाहीतर थेट कर्नाटकात गेली तीही एकटीच.नुसतीच गेली नाहीतर तिने मनसू मल्लिगे हा चित्रपटही केला.पण हा कन्नड सैराटचा रिमेक बनवताना भाषेच्या अडचणीही तिला नक्कीच आल्याही असतील.

आर्ची म्हणते, ' सुरुवातीला मला काहीच कन्नड कळायचं नाही. कन्नड भाषेचा 'अ'ही माहीत नव्हता. थोडक्यात, डबड्यात खडे टाकल्यानंतर जसा आवाज येतो, मला तशीच कन्नड भाषा वाटायची. पण नंतर हळूहळू भाषा शिकत गेल्यानंतर त्यातला गोडवा कळत गेला. '

पुढे ती म्हणाली, ' मला कन्नड यावं म्हणून सेटवर माझ्याशी सगळे जण कन्नड भाषेतच संवाद साधायचे. '

मनसू मल्लिगेचं दिग्दर्शन एस. नारायण यांनी केलंय. सैराट आणि मनसू मल्लिगेची तुलना करायची झाली तर या सैराट हा रिऑलिस्टिक तर मनसू मल्लिगे व्हिज्वअली बऱ्यापैकी भव्यदिव्य असला तरी काहीसा फिल्मी वाटतो.कलर थीमही पूर्णपणे जांभळी आहे.आर्चीलाही सिनेमामध्ये काहीसं जाड दाखवण्यात आलंय.

एकूणच काय तर दाक्षिणात्य सिनेमांची गरज लक्षात घेऊन आवश्यक ते सर्व बदल मनसू मल्लिगेमध्ये दिसतात.पण तरीही गाण्यांमधल्या आर्चीच्या काही फ्रेम्स जशाच्या तशा उचलल्यात.म्युझिकही अजय अतुलचंच असून काही गाणी देखील त्यांनीच गायलीत.सिनेमाच्या उत्तराधार्थात आणखी एक गाणं वाढवण्यात आलंय. पण आर्चीच्या लेखी सैराट आणि मनसू मल्लिगेमधला फरक सांगायचा झाला तर फक्त सिनेमाचा हिरो तेवढा बदललाय बाकी सगळं सारखचं आहे.

मनसू मल्लिगेचा या शब्दाचा अर्थ मनातला मोगरा असा होतो.त्यामुळे सैराटच्या चाहत्यांनी उत्सुकता म्हणून हा कन्नड सैराट एकदातरी पाहायला काहीच हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 12:59 PM IST

ताज्या बातम्या