• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 2 दिवसांतच शिकली बुलेट चालवायला; पाहा संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा SWAG

2 दिवसांतच शिकली बुलेट चालवायला; पाहा संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा SWAG

राजा रानीची गं जोडी (raja rani chi ga jodi) मालिकेतील एका सीनचं शूटिंग सुरू असताना संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा SWAG बघायला मिळाला.

 • Share this:
  मुंबई  19 ऑक्टोबर : कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी  (raja rani chi ga jodi)मालिका महाराष्ट्रात तुफान गाजते आहे. संजू आणि रणजीत ढालेपाटील (sanjeevani ranjeet dhale patil )म्हणजेच शिवानी सोनार – मनिराज पवार( shivani sonar and maniraj pawar )यांना प्रेक्षकांचे मालिका सुरू झाल्यापासूनच भरभरून प्रेम मिळते आहे. मालिकेतील संजू तिच्या बेधडक आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी लोकप्रिय आहे. कुटुंब असो वा नोकरी संजू तिची जबबाबदारी प्रामाणिकपणे आणि चोखपणे निभावते आहे. मालिका सुरू झाली तेव्हा संजूचा 'TOKKKK' संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाले आणि अजूनही फेमस आहे. संजू PSI झाल्यापसून  पोलीस चौकीच्या कामात, गुन्हेगारांना शिक्षा देण्यात बरीच व्यग्र असते. आणि यामध्ये संजूला रणजीतची खंबीर साथ मिळते आहे. नुकतचं एका सीनचं शूटिंग सुरू असताना संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा SWAG बघायला मिळाला.  संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा SWAG; दोन दिवसात शिकले बुलेट चालवायला
  संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा SWAG; दोन दिवसात शिकले बुलेट चालवायला
  शिवानी म्हणाली, “सध्यस्थिति बघता आम्ही सगळेच बायोबबल मध्ये होतो. त्यामुळे हॉटेलच्या परिसरात मी बुलेट चालवायला शिकले. मनिराजने म्हणजेच रणजीतने मला बुलेट चालवायला शिकवले. त्याच्याकडे त्याची स्वत:ची बुलेट असल्याने थोडं सोपं गेले. अगदी एक – दोन दिवसातच मी शिकले चालवायला”. वाचा :  संकर्षण कऱ्हाडे खरंच सोडणार 'तुझी माझी रेशीमगाठ' मालिका?अभिनेत्याने स्वतः दिलं उत्तर  सध्या सगळीकडे संजीवनीच्या बुलेट स्वॅगची चर्चा आहे. यापूर्वी देखील मालिका असतील किंवा चित्रपट अनेक अभिनेत्रींनी भूमिकेची गरज ओळखून बुलेट असेल रिक्षा असेल किंवा इतर कोणतेही वाहन चालवलं आहे.शिवानीने देखील तिच्या भूमिकेची गरज म्हणून दोन दिवसात बुलेट चालवायला शिकली आहे. सध्या संजीवनीच्या लेडी सिंघम स्वॅग सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.  रणजीतप्रणाणे संजीवनी देखील दिमाखात बुलेट चालवताना  दिसत आहे. वाचा : 'अनुपमा'चा इतका ग्लॅमरस अंदाज कधी पाहिलाय का? फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  राजा रानीची जोडी मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे. संजुने आता रणजीतचे स्वप्न पूर्ण केले आहे. PSI झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजु घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: