बोल्ड पोशाखामुळे प्रिया बापट झाली ट्रोल, दिलं टीकाकारांना उत्तर

बोल्ड पोशाखामुळे प्रिया बापट झाली ट्रोल, दिलं टीकाकारांना उत्तर

ही अभिनेत्री आहे प्रिया बापट. तिच्या कपड्यांमुळे सर्वत्र ट्रोल होताना दिसतेय.

  • Share this:

मुंबई, 25 आॅक्टोबर : सोशल मीडियावर ट्रोल होणं हा प्रकार काही नवा नाही. पण बऱ्याचदा बाॅलिवूडचे अभिनेते, अभिनेत्री ट्रोल होत असतात. पण यावेळी ट्रोल झालीय मराठी अभिनेत्री.

होय, ही अभिनेत्री आहे प्रिया बापट. तिच्या कपड्यांमुळे सर्वत्र ट्रोल होताना दिसतेय. सोशल मीडियावर प्रियाने सई ताम्हणकरसोबतचा एका कार्यक्रमातला फोटो शेअर केला होता. या फोटोतला ड्रेस पाहून अनेकांनी तिच्यावर टीका केली. यावर प्रियानेदेखील टीकाकारांना चांगलंच उत्तर दिलंय.

प्रियानं लिहिलंय, 'मला माहीत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. सोशल मीडियावर तुम्हाला तुमचं मत सांगायचा अधिकारही आहे. ज्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांना धन्यवाद. पण ज्यांना माझा ड्रेस आवडला नाही त्यांच्या मतांचाही मी आदर करते. माझे कपडे ही काही माझी ओळख नाही. माझं व्यक्तिमत्त्व माझा स्वभाव आणि काम यावर कळतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या कपड्यावरून तो कोण आहे, ते ठरवू शकत नाही. मला ट्रोल केल्याबद्दल मला वाईट वाटत नाहीय. '

प्रिया बापट इन्स्ट्राग्रामवर नेहमीच पोस्ट करत असते.  मध्यंतरी तिनं सईबरोबरची मुंबईच्या पावसात एक असा फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला ज्यामुळे सर्वांचं लक्ष तिथे गेलं.मुसळधार पावसात सुद्धा सकाळी जिमला जाऊन त्यांनी एक छानसा फोटो पोस्ट केला. प्रियानं लिहिलं होतं, आम्हाला जिमपासून कोणी थांबवू शकत नाही.

प्रिया आणि सईची मैत्री वजनदार या सिनेमापासून दृढ झाली .शैलेश परुळेकर या फिटनेस गुरुंकडे त्या जिमसाठी जातात. पावसात फिटनेसकडे दुर्लक्ष न करणं आणि उत्साहवर्धक राहणं हाच संदेश त्यांनी यानिमित्ताने चाहत्यांना दिलाय.

First published: October 25, 2018, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading