मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आयफोनवर चित्रित झालेला पहिला मराठी सिनेमा 'या' दिवशी होणर प्रदर्शित

आयफोनवर चित्रित झालेला पहिला मराठी सिनेमा 'या' दिवशी होणर प्रदर्शित

'पॉंडिचेरी' (PONDICHERRY) या आयफोनवर चित्रित होणाऱ्या पहिल्या मराठी सिनेमाबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. आता लवकरत सिनेमा रिलीज होणा आहे.

'पॉंडिचेरी' (PONDICHERRY) या आयफोनवर चित्रित होणाऱ्या पहिल्या मराठी सिनेमाबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. आता लवकरत सिनेमा रिलीज होणा आहे.

'पॉंडिचेरी' (PONDICHERRY) या आयफोनवर चित्रित होणाऱ्या पहिल्या मराठी सिनेमाबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. आता लवकरत सिनेमा रिलीज होणा आहे.

  मुंबई, 13 फेब्रुवारी- 'पॉंडिचेरी'  (PONDICHERRY) या आयफोनवर चित्रित होणाऱ्या पहिल्या मराठी सिनेमाबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. आता लवकरत सिनेमा रिलीज होणा आहे. प्रसिध्द दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. सई ताम्हणकरनं इन्स्टा पोस्ट करत या सिनेमाबद्दल माहिती दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, , मी तुम्हा सर्वांना थिएटरर्समध्ये खूप मिस केलं आहे. एक खास सिनेमा जो संपूर्णरित्या आयफोनवर चित्रित केला आहे तो तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. तेव्हा भेटूया, थिएटरमध्ये येत्या 28 फेब्रुवारीला.
  सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर अशी तगडी स्टारकास्ट यामध्ये दिसणार आहे. यासोबतच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांच्यासुध्दा या सिनेमात महतत्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा कसा असणार याबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. वाचा-'राजा राणीची गं जोडी'त रणजित- संजूला करणार एकदम फिल्मी स्टाईल प्रपोज सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'पॉंडिचेरी' या या सिनेमात वैभव आणि सई अशी नवीन जोडी रोमान्स करताना दिसणार आहे.सई ताम्हणकरने या आधी सचिन कुंडलकरसोबत 'वजनदार' या चित्रपटात काम केले होते. वैभव मात्र पहिल्यांदाच सचिन कुंडलकर सोबत काम केलं आहे. तसेच सई आणि वैभव हे दोघंही एकमेकांसोबत पहिल्यांदा काम केलं आहे. त्यामुळे ही जोडी किती बहारदार दिसणार आहे हे पाहणे नक्कीच इंटरेस्टिंग असेल. वाचा-अरुंधतीचा नवा लुक पाहून आशुतोष शॉक तर अनिरुद्धने काय केलं ते पाहचं... सई ताम्हणकर असेल किंवा अमृता खानविलकर या दोघींही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सई तिच्या फोटोशुटमुळे तर अमृता तिच्या डान्समुळे चर्चेत असते. आता या दोघींना एकत्र पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत. आयफोनवर चित्रीत झालेल्या या सिनेमा प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Sai tamhankar

  पुढील बातम्या