Home /News /entertainment /

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 'पावनखिंड' येणार भेटीला! चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला 'पावनखिंड' येणार भेटीला! चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर

बहुचर्चित 'पावनखिंड' या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. परंतु देशातील कोरोना परिस्थिती पाहता या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये विलंब होत होता.

  मुंबई, 15 जानेवारी-   महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील अनेक शौर्यगाथा आपल्याला माहिती आहेत. अशीच एक शौर्यगाथा म्हणजे ‘पावनखिंड’ (Pavankhind) चा थरार. याच पावनखिंडचा थरार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘पावनखिंड’ हा ऐतिहासिक चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. 10 जूनला 2021 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र देशातील कोरोना परिस्थितीमुळे या चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली आहे. बहुचर्चित 'पावनखिंड' या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. परंतु देशातील कोरोना परिस्थिती पाहता या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये विलंब होत होता. गेल्यावर्षी म्हणजेच 10 जून 2021 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाचा हाहाकार पाहून ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आज तब्बल सहा महिन्यांनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत 'पावनखिंड' च्या प्रदर्शनची तारीख जाहीर केली आहे. सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेला 'पावनखिंड' हा चित्रपट येत्या 18 फेब्रुरीला आपल्या भेटीला येणार आहे. या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चिन्मय यांची ही पोस्ट पाहून चाहते फारच आनंदी झाले आहेत. त्यांनी कमेंट्स करून आपला आनंद व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर चित्रपट प्रदर्शनास जरी विलंब झाला असला तरी आमचा उत्साह तसाच असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.
  चिन्मय मांडलेकरांची पोस्ट- चिन्मय मांडलेकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'जय जिजाऊ! जय शिवराय! हिंदवी स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही आपल्या चित्रपटांतुन करत आलो आहोत. आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने हे कार्य पुढेही सुरु ठेवणारच आहोत. इतिहासाच्या अतुलनीय पराक्रमाची परिसीमा म्हणजे पावनखिंडीचा रणसंग्राम. छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू आणि बांदल सेनेचा पराक्रम सिनेमागृहात मोठ्या पडद्यावर सर्वांनी अनुभवावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात. कोव्हिडमुळे उद्भवलेली ही परिस्थिती देखील तशीच आहे. या अपरिहार्य परिस्थितीमुळे आम्ही आमचा चित्रपट 'पावनखिंड' आता शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दिनांक 18 फेब्रुवारी 2022 ला प्रदर्शित करत आहोत'.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या