या मराठी सिनेमात दिसणार नीना कुलकर्णी- स्वप्नील जोशीचं अनोखं नातं

या मराठी सिनेमात दिसणार नीना कुलकर्णी- स्वप्नील जोशीचं अनोखं नातं

मोगरा फुलला चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. पोस्टरमध्ये स्वप्नील जोशी आणि नीना कुळकर्णी यांचा लुक शेअर करण्यात आला.

  • Share this:

मुंबई, ०५ एप्रिल- ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘मोगरा फुलला’मध्ये हिंदी व मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी या स्वप्नील जोशीच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

नाजूक नात्यांचा गुंफलेला हा गजरा म्हणजेच ‘मोगरा फुलला’! या भावनिक चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नील जोशीच्या खंबीर आईची भूमिका नीना कुळकर्णी साकारत आहेत. नुकतेच चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. पोस्टरमध्ये स्वप्नील जोशी आणि नीना कुळकर्णी यांचा लुक शेअर करण्यात आला. आईच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपलेला स्वप्नील या पोस्टरमध्ये दिसत आहे. ‘आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ’ असं कॅप्शनही या पोस्टरला देण्यात आला आहे.

या सिनेमाबद्दल बोलताना नीना कुळकर्णी म्हणाल्या की, ‘मी सेटवर काम करणं फार एन्जॉय केलं. कारण या चित्रपटाची दिग्दर्शिका श्रावणी माझी जुनी मैत्रीण आहे. तसंच स्वप्नीलबरोबर पुन्हा १४ वर्षांनी काम करायला मिळालं. तसंच चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे या सर्वांबरोबर पुन्हा काम करायला मजा आली. 'मोगरा फुलाला' ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. या कथेमधील माझं पात्र साकारताना मला खूप समाधान मिळालं.'

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशीबरोबर सई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यांमध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांना फिल्मफेअर आणि स्क्रीन यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. ‘मोगरा फुलला’ला स्वतःचा असा वेगळा ‘टच’ देण्यास त्या सज्ज झाल्या आहेत.

VIDEO : चव्हाणांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले...

First published: April 5, 2019, 7:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading