मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Duniyadari movie : 'तेरी मेरी यारी...' आता 'पुन्हा दुनियादारी'; Friendship Day च्या दुसऱ्याच दिवशी संजय जाधवची मोठी घोषणा

Duniyadari movie : 'तेरी मेरी यारी...' आता 'पुन्हा दुनियादारी'; Friendship Day च्या दुसऱ्याच दिवशी संजय जाधवची मोठी घोषणा

Duniyadari movie

Duniyadari movie

पहिला दुनियादारी हा सिनेमा जुन्या काळातील लव्ह स्टोरीवर आधारित होता. आता हा चित्रपट नव्या रूपात पुन्हा पाहायला मिळणार आहे.

  मुंबई, 8 ऑगस्ट : संजय जाधव दिग्दर्शित 'दुनियादारी' चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला होता. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला नवीन उंचीवर नेऊन ठेवले होते. हा सिनेमा मल्टिस्टारर सिनेमा होता. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. आता नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. संजय जाधव ने या चित्रपटाची घोषणा केली आहे. दुनियादारी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना हि माहिती दिली आहे. त्यांनी  '2013 साली प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला भरपूर प्रेम दिलं ! तेरी मेरी यारी ...चल करू दुनियादारी म्हणत प्रत्यक्षात ते मैत्रीचे क्षण आमच्या सोबत जगले. ते जग , ती मैत्री , ते प्रेम आणि तीच दुनियादारी आता पुन्हा घेऊन आलोत मैत्रीच्या नव्या ढंगात आणि प्रेमाच्या नवीन रंगात. एका नव्या युगाची , नवीन रंगाची न्यु एज ईस्टमन कलर लव्हस्टोरी.. तेरी मेरी यारी ... आता 'पुन्हा दुनियादारी' !!!'' असे कॅप्शन टाकत पोस्ट शेअर केली आहे.
  पहिला दुनियादारी हा सिनेमा जुन्या काळातील लव्ह स्टोरीवर आधारित होता. अनेक नात्यांची गुंतागुंत या चित्रपटात दाखवली गेली होती. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची आणि गाण्यांची अजूनही क्रेझ आहे. आता हा चित्रपट पुन्हा पाहायला मिळणार म्हणल्यावर प्रेक्षक खुश झालेत. हेही वाचा - Ankush chaudhari : अंकुश चौधरी पुन्हा थिरकणार मैनेच्या तालावर; पाहा व्हिडीओ या चित्रपटाची घोषणा झाली असली तरी त्यात कोण कोणते कलाकार असतील, जुनेच कलाकार नवीन रूपात पाहायला मिळतील का हि माहिती येणाऱ्या काळात  समोर येईल. हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. अल्पावधीतच या पोस्टवर प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी कमेंट्स करत उत्सुकता दर्शवली आहे.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या