Home /News /entertainment /

Boys 3 Teaser : बॉईज 3 या दिवशी थिएटरमध्ये येणार; धैर्य, ढुंग्या, कबीर पुन्हा घालणार राडा

Boys 3 Teaser : बॉईज 3 या दिवशी थिएटरमध्ये येणार; धैर्य, ढुंग्या, कबीर पुन्हा घालणार राडा

'बॉईज 3' मराठी फिल्मचे टीझर सोशल मीडियावर झळकलं आहे.

    मुंबई, 25 जून : अनेक मराठी चित्रपटांनी आपली एक वेगळी छाप सोडत प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण केली आहे. असाच एक चित्रपट म्हणजे ‘बॉईज 2’. धैर्य, ढुंग्या आणि कबीर या 'बॉईज'नी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावल्याचं पहायला मिळालं. आता हे तिघे पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत प्रेक्षकांना वेडं करायला.  नुकतेच 'बॉईज 3' चे टिझर (Boys 3  marathi movie Teaser )सोशल मीडियावर झळकले असून 16 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात हा धमाका उडणार आहे. 'बॉईज 3'मध्ये प्रतीक लाड(Pratik lad), पार्थ भालेराव(Parth Bhalerao), सुमंत शिंदे (sumant shinde) हे तिघे पुन्हा झळकणार असून चाहत्यांचीही उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  'बॉईज' आणि 'बॉईज 2' ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत चाहत्यांना भुरळ पाडली. 'बॉईज 3' ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अखेर तारिख अखेर या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले असून तारीखही जाहीर करण्यात आली आहे. तिघेही दाक्षिणात्य पेहेरावात दिसत असून यात तिघांचा एक वेगळाच स्वॅग आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवीन मुलगी आल्याचे दिसतेय. आता तिच्या येण्याने हे काय रंग उधळणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. हे वाचा - Veena Jagtap: वीणा जगतापची सेटवरची बेस्ट फ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री, पाहा हा खास video अ सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या सहयोगाने अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया निर्माते आहेत. आता या चित्रपटात काय नवीन पहायला मिळणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या