मराठी सिनेमाने करून दाखवलं! हा चित्रपट दाखवला जाणार गोल्डन ग्लोबमध्ये

चित्रपटाचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा यामुळे प्रत्येक वयोगटातील प्रत्येकाशी हा चित्रपट जोडला जाईल.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 05:37 PM IST

मराठी सिनेमाने करून दाखवलं! हा चित्रपट दाखवला जाणार गोल्डन ग्लोबमध्ये

मुंबई, 03 ऑगस्ट- ‘बाबा’ हा चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शित झाला असून त्याला चित्रपट समीक्षकांकडूनही प्रशंसा मिळाली. दिग्दर्शक आणि निर्माते यांनी घेतलेली मेहनत आणि चित्रपटाची सजग आणि मार्मिक अशी हाताळणी यामुळे चित्रपट सर्वत्र गाजत आहे. या चित्रपटाला लोकांची वाहवा मिळत असतानाच संजय दत्त प्रॉडक्शन्स आणि ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘बाबा’ चित्रपट ‘गोल्डन ग्लोब्ज २०२०’मध्ये दाखवला जाणार आहे. ‘बेस्ट मोशन पिक्चर्स’मध्ये परदेशी भाषा पुरस्कार विभागामध्ये त्याचे प्रदर्शन होणार आहे.

‘बाबा’ची निर्मिती ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’ आणि अशोक व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’तर्फे करण्यात आली आहे. हा चित्रपट राज आर गुप्ता यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात दीपक दोब्रियाल, नंदिता पाटकर, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, शैलेश दातार, जयंत गाडेकर आणि बालकलाकार आर्यन मेघजी यांच्या भूमिका आहेत.

या चित्रपटाची निर्माती मान्यता दत्त म्हणाली की, “आम्हांला अभिमान वाटतो की आमची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘बाबा’ गोल्डन ग्लोब्जमध्ये दाखवला जाणार आहे. आमचा यापुढे अर्थपूर्ण आणि तरीही मनोरंजन करणारे चित्रपट करण्याचा मानस आहे. ‘बाबा’ त्याच पठडीतील चित्रपट आहे. मला पूर्ण आशा आहे की या चित्रपटाला प्रेक्षकांची साथ आणि त्यांचे प्रेम मिळेल.”

‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’च्या अशोक सुभेदार यांनी ‘बाबा’ या चित्रपटाची निवड ‘गोल्डन ग्लोब्ज’साठी झाल्याबद्दल आनंद आणि उत्कंठा व्यक्त केली. “बाबा’ हा कोकणातील एका अत्यंत सुंदर अशा गावात आकाराला येणारी कथा पडद्यावर साकारतो. चित्रपटाचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा यामुळे प्रत्येक वयोगटातील प्रत्येकाशी हा चित्रपट जोडला जाईल. आमचा पहिला चित्रपट ‘बकेट लिस्ट’प्रमाणे ‘बाबा’या चित्रपटालाही तेवढीच यश मिळेल, अशी मला पूर्ण खात्री आहे. आम्ही आणखीन चित्रपटांची निर्मिती करण्याचा विचार करत आहोत. त्यात प्रादेशिक, मुख्य धारेतील चित्रपटांचा समावेश असून ते मराठी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये असतील,” असेही श्री अशोक सुभेदार यांनी म्हटले.

अशोक आणि आरती सुभेदार यांनी ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ या आपल्या बॅनरखाली नवीन आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्याचे आपले धोरण कायम राखले. याच धोरणाला अनुसरून त्यांनी ‘बाबा’ या चित्रपटाची निवड केली. चित्रपटाला आवश्यक असलेले प्राथमिक पाठबळ दिले. त्यांनी राज गुप्ता यांच्याबरोबर सहकार्य करत आणि त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देत सर्वोत्तम अशी निर्मिती करण्यासाठी पाठबळ दिले. संजय दत्त प्रॉडक्शन्समुळे या निर्मितीला एक वेगळा दर्जा प्राप्त झाला.

Loading...

मनसेसमोर अभिनेता अक्षय कुमारची माघार, Mission Mangal चं यू-टर्न

हॉटेलमधून शॅम्पूच्या बाटल्या चोरायची दीपिका, बेस्ट फ्रेंडने सांगितलं गुपित

करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

बॉलिवूडच्या या 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 05:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...