S M L

VIDEO : 'अगडबम'ची नाजुका म्हणतेय 'अटक मटक'

Updated On: Sep 14, 2018 01:51 PM IST

VIDEO : 'अगडबम'ची नाजुका म्हणतेय 'अटक मटक'

मुंबई, 14 सप्टेंबर : तुम्हाला तृप्ती भोईरचा सिनेमा 'अगडबंब' आठवतोय ना? त्यात सर्व ट्रिक्स वापरून तृप्तीची एक गलेलठ्ठ महिला केली होती. आता पुन्हा एकदा या रूपात भेटायला येतेय. म्हणजे आणखी धमाल बघायला मिळणार आहे.

तृप्ती 'अगडबंब' सिनेमाचा सीक्वल 'माझा अगडबंब' सिनेमा घेऊन येतेय. या सिनेमातलं 'अटक मटक' हे गाणं लाँच केलं. या धम्माल गाण्याला आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभला आहे. मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या 'अटकमटक' गाण्याला, टी. सतीश चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. नाजुकाच्या विविध करामती दाखवणारे हे गाणे पाहणाऱ्यांना मनोरंजनाची नवी 'चटक' लावून जाते. येत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका आहे.

सिनेमात सुबोध भावे तृप्तीच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे. सिनेमात दोन गलेलठ्ठ व्यक्तींमध्ये सुबोध भावे अडकलाय. त्याची फारच ओढाताण होतेय. या नाजुकाची सासू आहे  उषा नाडकर्णी. त्यामुळे सासू-सुनेची जुगलबंदी चांगलीच रंगणार आहे.

या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचं दिसून येत आहे. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या या सिनेमाचं नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आलं.

Loading...
Loading...

सिनेमाचं गाणं अटक मटक चवळी चटक गाणं खूपच धमाल आहे. या धमाल गाण्यातून सिनेमाची कथाही समोर येते. आता 26 आॅक्टोबरपासून मनोरंजनाचा नवा डोस मिळणार असं दिसतंय.

Big Bossच्या घराचे फोटो आले बाहेर, पहा स्पर्धकांचं कसं करणार स्वागत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 01:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close